यावल मुख्याधिकारीला रंगेहात पकडले..२८ हजाराची मागितली होती लाच

Anticorruption Trap Jalgaon : जळगाव येथील ठेकेदारास मुख्याधिकारी बबन तडवी याने साडेसात लाखाची लाच मागीतली होती.
Anticorruption Trap
Anticorruption TrapAnticorruption Trap
Updated on

यावल: येथील पालिकेचे मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी ( Corporation Chief Officer) यांस रस्ता काँक्रीटीकरण कामाची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी ठेकेदाराकडून २८ हजार रुपये लाच स्विकारतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (Anticorruption Squad) रंगेहाथ पकडले (Anticorruption Trap) . ही घटना शुक्रवारी (ता.३०) दुपारी एक चे सुमारास घडली. या घटनेमुळे पालिका वर्तुळा सह शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्याधिकारी बबन तडवी याचे पाचोरा येथील निवासस्थानी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पथक रवाना झाले आहे. येथील पालिकेच्या सव्वाशे वर्षाच्या इतिहासात लाच स्वीकारतांना मुख्याधिकाऱ्यास अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.

(yawal corporation chife officer accepting bribe arrested by anticorruption squad)

Anticorruption Trap
आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?


येथील पालिकेमार्फत शहरात वाणी गल्लीत रस्ता काँक्रीटीकरण कामाची वर्क ऑर्डर मिळणेसाठी व साठवण तलावाचे देयकापोटी जळगाव येथील ठेकेदारास मुख्याधिकारी बबन तडवी याने साडेसात लाखाची लाच मागीतली होती. दरम्यान यातील २८ हजार रुपयांचा पहिला हप्त्याची लाच आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांचे दालनात संबंधित ठेकेदाराकहून २८ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने श्री. तडवी यांना रंगेहाथ पकडले.

मुख्याधिकारी कारकीर्द संशयास्पद...
मुख्याधिकारी बबन तडवी हे १० ऑगष्ट २०१९ला येथे रुजू झाल्यापासून ते वादातीत होते. पालिकेचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सईद शेख यांना निलंबित न करण्यासाठी, सेवानिवृत्त कर्मचारी अशोक चव्हाण यांच्या पगारी रजा कालावधीचा पगार देण्यासाठी पैशांची मागणी, कोरोना काळात पालिकेचे कर्मचारी सूर्यकांत पाटील यांचे निधन झाले होते. शासनाकडून त्यांचे निधनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी देखील पैशांची मागणी, तसेच प्रत्येक लहान मोठया ठेकेदारांकडून मुख्याधिकारी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप आहे.

Anticorruption Trap
‘पिकेल ते विकेल’ संकल्पनेतून शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पन्न


" गेल्या चार ते सहा महिन्यापासून नगर परिषदेत अक्षरशः पैशांचा बाजार मांडला होता. मुख्याधिकारी व पालिकेच्या एका पदाधिकारी चे नातेवाईक प्रत्येक ठेकेदारास अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे होत्या. पालिकेचे लेखापाल व इतर काही कर्मचारी सुद्धा उन्मत्तपणे वागत होते. त्यांना देखील मी समजावण्याचा
प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकले नाही. ठेकेदारांनी माझ्या कानावर या गोष्टी टाकल्यावर मी त्यांना योग्य वाटेल ते करा. असा सल्ला दिला. या प्रकरणात मुख्याधिकारी बबन तडवी जरी लाच घेतांना सापडले असले, तरी यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. म्हणून एसीबीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.
- अतुल पाटील, गटनेता, यावल नगर परिषद .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()