जेवायला एकच पोळी दिल्याचा राग..चुलत भावांना थेट विहीरीत फेकले

अतिशय क्रुरतेने त्याने या दोघा बालकांना विहिरीत टाकून त्याचा जीव घेतला.
crime
crime
Updated on

यावल: जेवायला एकच पोळी दिली, वडीलोपार्जित शेतजमीनीत (Farmland) उत्पन्न दाखवत नाही, आणि नोकरासारखी वागणूक दिल्याचा राग डोक्यात ठेऊन चुंचाळे (ता. यावल) येथील बेपत्ता दोन सख्या चुलत भावांना (Cousins) विहीरीत टाकून ठार (throwing in the well) केल्याची कबुली संशयित निलेश सुरेश सावळे ( वय ३२ ) याने पोलिसांजवळ दिली आहे.

crime
पारोळाः अखेर पीम किसान गैरव्यवहारप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

तालुक्यातील चुंचाळे येथील बेपत्ता दोघा बालकांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतलेल्या संशयित निलेशने कबूली दिली आहे. संशयित निलेश सावळे विरुद्ध यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार (ता. २७) पासून बेपत्ता बालकांचा गुरुवारी (ता.२८) दुपारी विहिरीत मृतदेह आढळून आला होता. कुठल्याच प्रकारचा धागादोरा नसताना पोलिसांनी या गुन्ह्याचा शिताफीने उलगडा केला आहे. चुंचाळे (ता. यावल) येथील रहिवाशी रवींद्र मधुकर सावळे व सौ. उज्वला सावळे या दांपत्यास हितेश व रितेश अशी दोन अपत्ये होती. चुंचाळे शेतशिवाराला लागून गायरान भागात त्याची शेती आहे. बुधवारी (ता. २७ ) सावळे दांपत्य आपल्या बालकांसोबत व त्यांचा पुतण्या निलेश सुधाकर सावळे यांना घेऊन शेतात गेले होते. दुपारी दोनला काम आटोपल्यावर आपण घरी जाऊ म्हणून त्यांनी आपल्या मुलांना आवाज दिला. मात्र सहा वर्षीय हितेश आणि पाच वर्षीय रितेश हे दोघं मुलं शेतात दिसली नाही. म्हणून त्यांनी आपला पुतण्या नीलेश सावळे यास विचारलं असता, त्याने सांगितले, की येथेच खेळत होती कुठेतरी गेले असतील. आणि त्यांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. अंधार पडू लागला मात्र दोघं मुलं आढळून आली नाही. तेव्हा याबाबत त्यांनी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजित शेख, हवलदार नरेंद्र बागुल या पथकाने या भागात ग्रामस्था सह रात्री शोध मोहीम राबवली. मात्र सदर दोघं मुले कुठेच आढळून आली नाही. तेव्हा पोलिसांनी निलेश सावळे याच्याकडे चौकशी केली असता, तो थोडे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा निलेश सावळे या तरुणावर संशय बळावला. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि पुन्हा गुरुवारी (ता.२८) सकाळी त्याला सोबत घेऊन बालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बालक मिळत नाही म्हणून त्यांचा चुलत भाऊ निलेश सुधाकर सावडे (वय ३२) याच्याकडे थोडी सक्तीने पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. आणि गुन्हाची कबुली दिली. त्यांने सांगितले, की आपण दोघं बालकांना बुधवारी (ता.२७) आपल्या शेतातील विहिरीत टाकले आहे अशी धक्कादायक माहिती त्याने दिली. दुपारी साडेतीनला या दोघा बालकांचे मृतदेह विहिरीत मिळून आले. निलेश सावळे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
जळगावः वरणगावजवळ २० लाखांचे बायोडिझेल जप्त

संशयित आरोपी निलेश सावळे यांने सांगितले ,की आपली वडिलोपार्जित शेती आहे. त्याचे उत्पन्न आमचे काका ( रविंद्र सावळे) बरोबर दाखवत नाही. मी त्यांच्या घरी आलो तर मला नोकरा सारखी वागणूक देतात.बुधवारी (ता.२७) सकाळी दहा वाजता आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर मला फक्त एकच पोळी दिली व ते सर्व पोटभर जेवली. परत दुपारी बारा वाजता त्या दोघा पोरांना त्यांनी जेऊ घातले .पण मला विचारलं सुद्धा नाही. याचा मला प्रचंड राग आला होता. म्हणून रागाच्या भरात मी विहिरी जवळ जाऊन बसलो होतो. तेव्हा ही दोघं पोरं विहिरी जवळ आली. आणि विहिरीत दगडं टाकीत होती. मी त्यांना विहिरीत दगड टाकू नका असं सांगितलं, तर त्यांनी मला दगड मारला. म्हणून मी संतापात दोघांना उचलून विहिरीत टाकलं अशी धक्कादायक कबुली संशयित निलेश सावळे यांनी दिली आहे. अतिशय क्रुरतेने त्याने या दोघा बालकांना विहिरीत टाकून त्याचा जीव घेतला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजित शेख, हवालदार नरेंद्र बागुल यांची भूमिका महत्वाची ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()