चोरट्यांचा प्रामाणिकपणा..चोरलेली रक्कम तपशीलासह लिहून ठेवली

Yawal Crime News: यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चोरटे शहरातीलच आहेत का ?
Shop
Shop
Updated on

यावल: येथील पोलीस ठाण्यापासून (Yaval Police Station) अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या,तसेच टी पॉईंटच्या गजबजलेल्या चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) व्यापारी संकुलनातील श्रीहरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स (Provision Stores) दुकानात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी (Theft) दुकान फोडले.

Shop
टिप देणाऱ्यांची हजारांत बोळवण..आणि अ‍ॅक्शनवाले लाखांत

लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानाचे कूलूपे, शटर,लोखंडी चॅनेलगेट तोडून चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सामानाची शोधाशोध करून दुकानातील गल्यात असलेले रोख सहा हजार ४०० रुपयेची रोकड व काही चिल्लर घेऊन त्यांनी पोबारा केला. सदरची रक्कम मोजून एका कागदावर बेरीज लिहून ठेवून रक्कम अज्ञात चोरटे घेऊन फरार झाले आहेत.

Shop
चाळीसगाव तालुक्यातील २० गावांना पुराचा वेढा;२०० गुरे वाहून गेली

व्यापाऱ्यांमध्ये खळबळ..

याबाबत यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चोरटे शहरातीलच आहेत का ? याबाबतची चौकशी करणे यावल पोलिसांना एक मोठे आव्हान ठरले आहे. यावल पोलिसांची रात्रीची गस्त आहे किंवा नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

Shop
धुळे तालुक्यात कापसावर मरचा रोगाचा वाढला प्रादुर्भाव

चोरलेली रक्कम लिहून ठेवली

विशेष म्हणजे सदर चोरट्यांनी चोरी करतांना दुकानाची तोडलेली कुलुपे, टॉमी दुकानाबाहेर ठेवली होती. तर चोरी केलेले सहा हजार चारशे रुपयांच्या नोटांचे विवरण दुकानाचे काउंटरवर एका कागदावर प्रामाणीकपणे त्यांनी लिहून ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()