ऐन दिवाळीत..टपाल विभाग ऑनलाईन भरणा वेबपोर्टला तांत्रीक अडचण

गेल्या आठ- दहा वर्षांपासून अस्लास कार्ड टपाल विभागाकडूनही वितरण करण्यात येत नसल्यामुळे राज्यात आज अस्लास कार्डचा तुटवडा मोठया प्रमाणावर आहे.
Indian Postal Department
Indian Postal Department
Updated on

यावल: टपाल विभागाचा (Indian Postal Department) आर्थिक कणा असलेल्या महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेचा (Mahila Pradhan Kshetri Bachat Yojana) ऑनलाईन भरणा टपाल विभागाच्या वेबपोर्टलवर करण्यास तांत्रीक अडचण निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देशभरात २ नोव्हेंबरपासून एकही भरणा होऊ शकला नाही. यामुळे संपूर्ण देशभरात दररोजचा भरणा सुमारे पाच कोटीपेक्षा जास्त भरला जावू शकला नाही. टपाल खात्यात सध्या भरणा येत नसल्यामुळे सर्वत्र आर्थीक चणचण भासू लागली आहे. या निमित्ताने सर्वत्र जणू काही वणवा पेटला असल्याचे दृश्य आहे. पर्यायाने ऐन दिवाळीत महिला प्रतिनिधींचा भरणा न झाल्यामुळे त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.

Indian Postal Department
शिरपूर : जैन बनले हळद पिकाचे ‘आगार’!

टपाल विभागाच्या माहिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या ऑनलाईन भरण्यात टपाल खात्याच्या वेबपोर्टलवर अस्लास (ASLAAS) कार्ड क्रमांक टाकण्याची अट विभागाने याच महिन्यापासून सुरू केली. मात्र सदरचे अस्लास कार्ड अल्पबचत, महसूल, व टपाल विभागाकडेच उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत कार्ड क्रमांक टाकणार कसा असा प्रश्न प्रतिनिधींसमोर उपस्थित झाला आहे. वास्तविक महाराष्ट्र राज्यात दहा ते बारा वर्षांपासून अल्पबचत विभाग बंद झाला असून महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना प्रतिनिधी व अल्पबचत योजना प्रतिनिधींचे लायसन नुतनीकरणाचे काम महसूल विभागाचे एका अधिकाऱ्याकडे प्रभारी म्हणून सोपविले आहे. असे असतांना गेल्या आठ- दहा वर्षांपासून अस्लास कार्ड टपाल विभागाकडूनही वितरण करण्यात येत नसल्यामुळे राज्यात आज अस्लास कार्डचा तुटवडा मोठया प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत कार्ड उपलब्ध नसतांना त्यावरील कार्ड नंबर वेबपोर्टलवर टाकणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दर महिन्यास पंधरा तारखेपूर्वी भरणा होत असलेल्या खात्यांवरही भरणा होत नसल्यामुळे या खात्यांवर पंधरा तारखेपूर्वी भरणा न झाल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल. भरणा तयार असतांना तांत्रीक अडचणीअभावी भरणा करता न आल्यास दंडाचा भुर्दंड माहिला प्रतिनिधींना बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रत्येक राज्य पातळीसह देशपातळीवर विविध संघटनामार्फत हालचाल गतीमान झाल्या असून येत्या सोमवारी (ता. ८) केंद्रीय स्तरावर अर्थविभागात सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात देशभरात प्रत्येक जिल्हास्तरावर संघटनेमार्फत बैठका सुरू झाल्या आहेत.

संबंधित यंत्रणेने अस्लास कार्ड मुबलक प्रमाणात ग्रामीण भागातील शेवटच्या प्रतिनिधीपर्यंत मिळण्याची व्यवस्था केल्यानंतरच वेबपोर्टलवर अस्लास कार्ड क्रमांक टाकण्याची अट घालावी. तोपर्यंत ती त्वरीत हटवावी अशी मागणी महिला प्रतिनिधींकडून होत आहे. जळगाव येथील मुख्य टपाल कार्यालयात अल्पबचतठेव योजनेसाठीचे चेक रिसीट बुक गेल्या सहा महिन्यांपासून शिल्लक नसल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल काळे यांनी सांगितले.

Indian Postal Department
जळगाव : दुचाकी, चारचाकीसह सोन्यालाही झळाळी

शासनाने महिला प्रतिनिधींना ऐन दिवाळीत उपाशी राहण्यासाठी दिवाळी भेट दिली आहे. प्रतिनिधींची यंदाची दिवाळी काळी झाली असून, स्लोली पॉयझन देऊन प्रतिनिधींना संपवून टाकण्याचे हत्यार उपसले आहे. एजंट संघटीत नसल्याकारणाने त्यांची ही दूर्दशा झाली आहे.

- अनिल अवधूत काळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र महासंघ,अल्पबचत प्रतिनिधी संघटना....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()