ईदसाठी घरी निघालेल्या तरुणाचा मृत्यू; पाणी पिताना घडला अपघात

ईदसाठी घरी निघालेल्या तरुणाचा मृत्यू; पाणी पिताना घडला अपघात
railway cutting
railway cuttingrailway cutting
Updated on

जळगाव : ईदसाठी मुंबईहून (Mumbai) घराकडे हावडा येथे जाणाऱ्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून (railway accident) पाय घसरुन पडल्याने मृत्यु झाला. अबजूर शेख जियाऊल हक (वय २३, रा. रहिमपूर, माणिकचक, इनायतपूर जि. मालदा पश्चिम बंगाल) असे मयत तरुणाचे नाव असून लोहमार्ग पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (ramjan id boy going home but railway accident death)

railway cutting
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच

पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी अबजूर शेख जियाऊल हक हा तरूण नवी मुंबईतील घनसोली येथे गेल्या तीन महिन्यांपासून बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून कामाला आला होता. आज सकाळी त्याचा भाचा मसीद ऊर रहेमान यांच्यासोबत रमजान ईदसाठी मुंबईहून पश्चिम बंगाल येथे गावी जाण्यासाठी आज सकाळी ८ वाजता मुंबईहून बसले होते.

दरवाजाजवळ पाणी पिण्यासाठी गेला अन्‌

मुंबई- हावडा मेल पाचोऱ्याहून जळगावकडे येत असतांना अबजूर शेख हा पाणी पिण्यासाठी जात असतांना रेल्वे बोगीच्या दरवाजाजवळ पाय घसरल्याने खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रेल्वे खांबा (क्र. ४००/ १३-१५) जवळ घडला. म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तर श्री. राजपूत यांनी जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोहेकॉ अनिंद्र नगराळे यांनी घटनास्थळी गेले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह भाचा मसीद ऊर रेहमान यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत तरूण हा अविवाहित असून त्याच्या पश्चात चार बहिणी, तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अनिंद्र नगराळे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()