स्वत:ची पाठ थोपटून घेणारे ठाकरे सरकार-गिरीश महाजन

Jalgaon Political News: जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारने मंजुरी दिली होती. ती कामे सुरू झाली होती.
MLA Girish Mahajan
MLA Girish Mahajan
Updated on
Summary

राज्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. यानंतर सरकारमधील तीन पक्ष रॅली काढताहेत, हजारो नागरिक जमवून कार्यक्रम घेताहेत.

जळगाव : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) दोन वर्षांत कोणतेही नवीन काम सुरू केलेले नाही. केवळ नाव देऊन श्रेय लाटण्याचे काम सरकार करत आहे. तरीही आपण राज्‍यात सर्वोत्‍कृष्‍ट मुख्‍यमंत्री (Chief Minister) म्‍हणून मिरवून घेत असून, आपली पाठ स्‍वतःच्‍याच हाताने थोपटून घेणारे सरकार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केला.
भाजपच्या वसंतस्मृती या जिल्‍हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole), माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बलानी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA Girish Mahajan
ऑक्सिजनच्या गरजेविना ‘डेल्टा’चे सहाही रुग्ण बरे

सर्व कामे बंद पाडली
जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारने मंजुरी दिली होती. ती कामे सुरू झाली होती. मात्र, अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्‍के काम झालेल्‍या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने ‘दमडी’ही दिली नसल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला. हे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. सर्व बाजूंनी फेल झाले असून, भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याची टीकाही महाजन यांनी केली.

MLA Girish Mahajan
अर्धे धड जमिनीवर आणि अर्धे धड झाडावर..या दृष्याने सर्वच भयभीत!


मग मंदिर बंद का?
राज्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. यानंतर सरकारमधील तीन पक्ष रॅली काढताहेत, हजारो नागरिक जमवून कार्यक्रम घेताहेत. त्‍या वेळी कोरोना पसरत नाही का? असे असताना मग मंदिरे बंद का ठेवलीत, असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

MLA Girish Mahajan
ऐन संकटात शेतीचा विज पुरवठा खंडीत;शेतकरी हवालदील


सरकारची चमकोगिरी : आमदार भोळे
आघाडी सरकारमधील नेते दौरे करीत आहेत. मात्र, त्‍यांना जनतेपर्यंत पोचण्यासाठी वेळ नाही. जिल्‍ह्यात राज्‍याच्‍या महिला व बालकल्‍याणमंत्री दौरा करून गेल्या, पण यावल तालुक्‍यात कुपोषणाने मृत्‍यू झालेल्‍या बालकाच्‍या कुटुंबापर्यंत जायला त्‍यांना वेळ नव्‍हता. मंत्री, सरकारमधील नेत्यांना केवळ चमकोगिरी करायची असून, तीनचाकी सरकार कसे टिकेल, यासाठीच प्रयत्‍न करीत आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, लालचंद पाटील आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील कॉलनी रस्त्यांच्या निधीबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. पिंप्राळा रेल्वे पूल, शिवाजीनगर पुलाबाबत रेल्वेमंत्री दानवे यांच्याशी चर्चा केल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()