जळगाव ः जीवन पाहिले, तर एक ‘कविता’ आहे, पाहिले तर ‘निबंध’ आहे. आलेला प्रत्येक क्षण आपल्या महत्त्वांकाक्षेप्रमाणे वापरतो. त्याचबरोबर इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. तो जीवनभर त्या संबंधितांच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. (Corona Patient Treatment) मग त्यासाठी त्याला ना देशाच्या सीमा अडवू शकतात ना परिस्थितीतीचे बांध.
जळगावमधील नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist) डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir)सीमेवर जाऊन कोरोनाकाळात उपचार केले. तेथील नागरिकांसाठी विरोध झुगारून आरोग्य शिबिरे घेतली. या देशप्रेमाला तेथील आरोग्य यंत्रणा अद्यापही विसरलेली नाही. काश्मीरमध्ये कोरेानाचे रुग्ण वाढल्याने तेथील आरेाग्य यंत्रणा डॉ. पाटील यांच्याशी रोज मोबाईलद्वारे संपर्क साधून म्युकरमायकोसीसच्या उपचाराबाबत माहिती घेत आहे. ती उपचारपद्धती तेथे लागू करून अनेकांचे प्राण वाचवत आहे.
काश्मीरमध्ये दोन लाख कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जम्मूमध्ये एक लाख २२ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. या बाधितांवर उपचार करण्यासाठी तेथील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहेत. जम्मू काश्मीरच्या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्रीयन सल्लागार म्हणून डॉ. पाटील कार्यरत आहेत. तेथील मोबाईल ग्रुपवर जिल्हा स्तरावरील मोठे अधिकारी, डॉक्टर आहेत. लक्षणे सांगून संबंधित रुग्ण कोणत्या आजारात मोडतो, त्यावर उपचारपद्धत कशी असावी, कोणत्या स्टेजला काय करावे आदी माहिती डॉ. पाटील यांना विचारली जाते. तेही अभ्यासपूर्ण माहिती ग्रुपवर टाकतात. वेळप्रसंगी फोनद्वारेही सल्ला देतात. जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णसेवा करू शकत नाही. किमान तेथील डॉक्टरांना, कोअर टीमला आरेाग्यविषयक मार्गदर्शन करू शकतो, याबाबत डॉ. पाटील यांना समाधान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.