Market Committee Election : निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस; 216 जागांसाठी 2 हजार 374 अर्ज

Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committeesesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार (Market Committees Election) समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. ३) अर्जांचा पाऊस पडला.

एकूण २१६ जागांसाठी दोन हजार ३७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी (ता. ५) अर्जांची छाननी होणार आहे. (market committee election 2 thousand 374 candidature were filed for total of 216 seats jalgaon news)

जळगाव, पाचोरा, बोदवड, रावेर, धरणगाव, भुसावळ, चोपडा बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. जळगाव बाजार समितीच्या १८ जागांसाठी एकूण २६८ अर्ज दाखल झाले आहेत. यात माजी सभापती कैलास चौधरी, लकी टेलर, प्रभाकर सोनवणे, सुनील महाजन यांच्यासह आजी-माजींचा समावेश आहे. यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.

जळगाव बाजार समितीच्या १८ जागांसाठी शेवटच्या दिवशी १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारांसोबत कार्यकर्ते असल्याने जळगाव बाजार समितीच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी मतदारसंघाच्या ११ जागा, तर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार, व्यापारी मतदारसंघाच्या दोन आणि हमाल व मापाडी मतदारसंघाची एक, अशा एकूण १८ जागांसाठी निवडणूक होत आहे.

दरम्यान, २७ मार्चपासून अर्ज विक्री व स्वीकृती करण्याची प्रक्रिया सुरू होती. सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. बुधवारी (ता. ५) अर्जांची छाननी होणार आहे. नंतर ६ ते २० एप्रिलपर्यंत माघारीसाठी मुदत आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Jalgaon Market Committees
Jalgaon Politics : नेते मोठे झाले, जळगाव नेतृत्वहीन... चूक नागरिकांची की?

जळगाव बाजार समितीसाठी मतदारसंघनिहाय दाखल अर्ज

-सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ ९५

-महिला राखीव सोसायटी मतदारसंघ २१

-इतर मागासवर्गीय सोसायटी मतदारसंघ २०

-भटक्या जाती विमुक्त जमाती व वि.मा.प्र. सोसायटी मतदारसंघ २५

-सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदारसंघ ४२

-अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत मतदारसंघ २०

-आर्थिक दुर्बल घटक ग्रामपंचायत मतदारसंघ १६

-व्यापारी मतदारसंघ २०

-हमाल व मापारी मतदारसंघ ९

-एकूण २६८

Jalgaon Market Committees
Jalgaon News : मांडळचा सत्तासंघर्ष रंजक वळणावर; गावाची दोलायमान स्थिती

बाजार समितीनिहाय दाखल झालेले अर्ज

तालुका-- दाखल अर्ज

जामनेर--२२४

यावल--१४४

चाळीसगाव--२१५

अमळनेर--१८७

जळगाव--२६८

पारोळा--१६०

पाचोरा--२३४

बोदवड--१८६

रावेर--१५३

धरणगाव--२३४

भुसावळ--८०

चोपडा--२८९

एकूण--२,३७४

Jalgaon Market Committees
Jalgaon News : अमळनेरला 165 ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर; DYSP राकेश जाधव यांची संकल्पना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.