Jalgaon News : धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात मतदान शांततेत पार पडले. एकूण ८९.६१ टक्के मतदान झाले. (market committee election 89 61 percent voting in Dharangaon jalgaon news)
सोसायटी मतदारसंघासाठी १२४८ पैकी ११०९, ग्रामपंचायत मतदारसंघासाठी १००९ पैकी ९७२, व्यापारी मतदार संघासाठी ३३० पैकी २४१, हमाल मापडी मतदारसंघासाठी ३१० पैकी २७४ मतदान झालेले आहे एकूण २५९६ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, रविवारी (ता.३०) विश्वकर्मा सोसायटीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सहकार पॅनलचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपचे पी. सी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सकाळपासून ठाण मांडून बसले होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तर शेतकरी विकास पॅनलचे नेते माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आणि दुपारपासून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, वाल्मीक पाटील, मंडपात ठाण मांडून बसले होते. आजी माजी पालकमंत्री यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने फार मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे.
ओबीसी राखीव गटात सहकारचे किशोर पाटील व शेतकरी विकासचे रमेश माणिक पाटील, एन. टी. गटात राष्ट्रवादी जिल्हा युवती सभेच्या अध्यक्ष तथा सहकार गटाचे उमेदवार कल्पीता पाटील व शेतकरी विकास चे दिलीप धनगर या लढती दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. तालुक्यांचे लक्ष या लढतीकडे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.