Jalgaon Market Committee Election : महाविकास आघाडीच्या पॅनलच्या 99 टक्के जागावाटप एकमताने

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon Market Committee Election : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे ९९ टक्के जागावाटप एकमताने झाले आहे. (Market Committee Election 99 percent seat allotment of Maha Vikas Aghadi panel is unanimous jalgaon news)

आता त्याचा कोणतही वाद नाही. प्रचाराचा संयुक्तिकपणे एक टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती पॅनलप्रमुख तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी दिली. बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी माघारीची अंतिम मुदत गुरुवारी (ता. २०) आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीतर्फे शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरले आहे. तीन पक्षांमुळे जागा वाटपाची मोठी कसोटी होती. त्याबाबत पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आमच्या आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाले आहे. एक ते दोन जागांबाबत चर्चा सुरू आहे. तो तिढाही सुटणार आहे. त्यामुळे आता जागा वाटपाबाबत आमचा कोणताही प्रश्‍न राहिलेला नाही. आम्ही मैदानात जोमाने उतरणार आहोत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
National Banana Day 2023 : ..तर केळी उत्पादनातील नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राकडे

प्रचाराचा एक टप्पा पूर्ण

माघारीनंतर प्रचाराला गती मिळते. त्यामुळे आम्ही अगोदरच नियोजन करून प्रचार सुरू केला आहे, असे सांगून श्री. देवकर म्हणाले, की आमचे ७५ टक्के जागावाटप अगोदरच पूर्ण झाले होते.

त्याबाबत एकमताने निर्णय झाला होता. त्यामुळे आम्ही त्या उमेदवारांच्या माध्यमातून भेटीगाठीस प्रारंभ केला होता. तो एक टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. आता उर्वरित जागावाटपही पूर्ण झाल्यानंतर नवीन उमेदवारांसह आम्ही आता दुसऱ्या टप्प्यातही गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

Jalgaon Market Committee election
Jalgaon Bypoll Election : 82 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()