Market Committee Election : रावेर बाजार समितीसाठी सर्वपक्षीय पॅनलची तयारी

Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committeesesakal
Updated on

रावेर (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Market Committee Election) सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढविण्याचा प्राथमिक निर्णय आज झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. (market committee election decision to contest election of Agricultural Produce through All Party Panel jalgaon news)

आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील व जिल्हास्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

येथील बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होणार आहे. त्यादृष्टीने येथील पीपल्स बँकेच्या सभागृहामध्ये माजी आमदार अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याबाबत चर्चा झाली.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्याने आमदार चौधरी व आमदार पाटील बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. शनिवार, रविवारी निवडणुकीबाबत त्यांच्या उपस्थितीत पुन्हा चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांतर्फे जिल्हास्तरावरही चर्चा करून सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या किसान सभेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष सुरेश धनके, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख योगिराज पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, नंदकिशोर महाजन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष किशोर पाटील, भाजपचे अध्यक्ष राजन लासूरकर, यशवंत धनके, शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील, नीळकंठ चौधरी, प्रा. सी. एस. पाटील, महेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Jalgaon Market Committees
Jalgaon News : महापालिकेतर्फे जागा घेतली, पण स्वच्छतागृह बंद..

या बैठकीपूर्वी काँग्रेसभवनात काँग्रेसच्या इच्छूकांची बैठक तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुमारे २५ पेक्षा जास्त इच्छुकांनी बाजार समितीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदार शिरीष चौधरी आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार जो निर्णय घेतील, त्यांचे पालन करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

दरम्यान, आज झालेल्या सर्वपक्षीय प्राथमिक बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना निमंत्रण नव्हते. सर्वपक्षीय पॅनलमध्ये सन्मानाने सहभाग मिळाल्यास आपण त्यात सहभागी होऊ, अन्यथा ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली समविचारी उमेदवारांचे पॅनल तयार करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

रावेर बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी आमदार एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील एका पॅनलला पाठिंबा देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्याची स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता, एकमत न झाल्यास बाजार समिती निवडणुकीत किमान तीन पॅनल तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Jalgaon Market Committees
Jalgaon News : चाळीसगावात रंगल्या कुस्त्यांच्या दंगली; उत्तर महाराष्ट्रातील मल्लांचे उत्कृष्ट प्रदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.