Market Committee Election : डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांसह रेखा पाटलांचाही अर्ज अवैध

Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committeesesakal
Updated on

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आज (ता. १३) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली. (Market Committee Election Dr Rekha Patel application along with Satish Patil application is also invalid jalgaon news)

यात बाजार समितीचा निकाल कायम ठेवत जिल्हा उपनिबंधकांनी डॉ. सतीश पाटील यांच्यासह रेखा पाटील यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सेवा सहकारी मतदारसंघ व इतर मागासवर्ग अशा दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

त्यावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. दिनकर पाटील यांनी हरकत घेतली होती. तर डॉ. सतीश पाटील यांनी अमोल चिमणराव पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या दोन्ही प्रकरणांची गुरुवारी (ता. १३) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Jalgaon Market Committees
Jalgaon News : ‘धन्यवाद मोदीजी’ आभारपत्रे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सुपूर्द

जिल्हा उपनिबंधकांनी अगोदरचा निर्णय कायम ठेवत, डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरविले. रेखा पाटील यांच्या अर्जावर मधुमती पाटील यांनी हरकत घेतली असता, त्यांचा देखील उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.

तर अमोल पाटील यांच्या विरुद्धचा आक्षेप फेटाळण्यात आला. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम १०(२)(।।) नुसार हे अर्ज अवैद्ध ठरविण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधकांकडून सांगण्यात आले.

"दबावतंत्राचा वापर करून माझे दोन्ही अर्ज अवैध ठरवले आहेत. पत्नी रेखा पाटील यांचा अर्ज सहायक निबंधकांनी वैध ठरविला असतानाही जिल्हा उपनिबंधकांनी मात्र तो अवैध ठरवला. माझ्याकडे उमेदवार सक्षम असून लोकशाही मार्गाने ही लढाई आम्ही जिंकू. सलग सुट्ट्या असल्यामुळे उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करू." - डॉ. सतीश पाटील, माजी आमदार ः पारोळा

Jalgaon Market Committees
Jalgaon News : अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.