Jalgaon : महामार्गालगत विस्तारली; अतिक्रमणाची ‘बाजारपेठ’

Encroachment On highway in Jalgaon
Encroachment On highway in Jalgaonesakal
Updated on

जळगाव : चौपदरी महामार्गाने वाहतुकीची समस्या सुटण्यापेक्षा त्या भोवतालच्या अतिक्रमणाने (Encroachment) हा प्रश्‍न अधिकच वाढला आहे. प्रभात चौकातील भुयारी मार्गापासून पुढे विद्युत कॉलनीपर्यंत सेवारस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकाम साहित्यासह खेळणी, माठ, शोभीवस्तूंच्या दुकानांची बाजारपेठच थाटली आहे. त्यामुळे या भागात अपघातांचा धोका दुपटीने वाढला आहे. (market of encroachment Expanded along the highway Jalgaon Encroachment News)

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढलेल्या वर्दळीमुळे महामार्गालगत समांतर रस्ते, चौपदरीकरण अथवा उड्डाणपुलाच्या मागणीचा प्रश्‍न दीर्घ कालावधीनंतर अलीकडेच सुटला. खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या अत्यंत वर्दळीच्या टप्प्यातील चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority) पूर्ण केले खरे, मात्र त्याचा वाहनधारकांना कवडीचाही उपयोग झालेला नाही. उलट चौपदरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला असून, त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.

Encroachment On highway in Jalgaon
Raj Thackeray : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षांना अटक

बाजारपेठच थाटलीय..

प्रभात चौकात बहिणाबाई उद्यानाला लागून महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत वाळू, विटा, खडी, खडीचा कच अशा बांधकाम साहित्याचा डेरा अनेक वर्षांपासून तसाच आहे. त्याठिकाणी मालवाहू वाहने गर्दी करत असतात. नियमित वाहतुकीत त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊन कोंडी होत असते. तर अग्रवाल चौकाच्या पुढे सलग शासकीय तंत्रनिकेतनपर्यंत माठ, शोभीवंत वस्तू, खेळणी, पडदे या साहित्याची बाजारपेठच थाटण्यात आली आहे. त्यात ऊसाचा रस, फळे, अन्य वस्तूंच्या गाड्या, स्टॉल्सने महामार्ग गिळायला सुरवात केली आहे.

Encroachment On highway in Jalgaon
Cyber Crime : अश्‍लिल चित्रफित प्रसारित करणाऱ्यास 3 लाख रुपये दंड

महापालिका झोपेत

महामार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. मात्र,अशीच स्थिती राहिली तर खूप मोठा अपघातही घडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वारंवार वृत्त देऊनही महामार्ग विभाग तसेच जळगाव महापालिकेची यंत्रणा झोपेत आहे. या अतिक्रमणावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.