यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील साकळी येथे लावण्यात येत असलेला बालविवाह प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (child marriage and Child Development) यांनी वेळीच दखल घेतल्याने तत्काळ थांबविण्यात आला. याबाबत वधू (Bride) आणि वर (Groom) पक्षांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात समज दिल्यानंतर भावी पती, पत्नीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. (Marriage of a minor girl stopped at Bhusawal Jalgaon News)
साकळी (ता. यावल) येथे रविवारी (ता.२३) चोपडा तालुक्यातील एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह साकळी येथील २७ वर्षीय युवकासोबत ठरल्याप्रमाणे होणार होता. मात्र नवरीच्या मावसभावाने येथे महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या होत असलेल्या बालविवाहासंदर्भात अर्ज दिल्याने या अर्जाची तत्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या वतीने अर्चना आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना तायडे आणि मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदिर हॉल लग्नास्थळी जाऊन हा होणारा बालविवाह थांबविला.
वधू आणि वर पक्षाकडील मंडळींना महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोळे, पर्यवेक्षिका कल्पना तायडे व साकळी अंगणवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदतीने येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी हा विवाह थांबविला व लग्न लावणाऱ्या दोघा मंडळींना अखेर पोलिस ठाण्यात यावे लागले. या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने महिला बालविकास अधिकारी अर्चना आटोले यांच्या मध्यस्थीने मुलगी ही अल्पवयीन असल्याने हा विवाह लावता येणार नाही, तसे झाल्यास आपल्याविरूद्ध गुन्हे दाखल होतील, अशी माहिती वधू- वराच्या मंडळींना पोलिसांकडून मिळाल्याने अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला. या संदर्भात पोलिसांनी वधू आणि वर मंडळींचे जाबजबाब घेतल्याने दोघ लग्न लावणारी मंडळी ही आपआपल्या गावी निघून गेली.
मानापानाचा विषय नडला
दरम्यान, वधूच्या मावसभावाने अल्पवयीन असल्याबाबत अर्ज दिला होता. आपल्या बहिणीचा विवाह व्हावा, या साठी धावपळ करणाऱ्यांनीच महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे या विवाहातील नवरी अल्पवयीन असल्याचे दाखले व अर्ज येथील कार्यालयात दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मानापानाचा विषय नडल्यानेच हा विवाह रखडल्याची चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.