विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला सहारा

अनिल याने वहिनीसह दोघा मुलांचे संगोपन व पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली अन् परिवाराला एक आनंदाची उमेद आली.
Marriage
Marriageesakal
Updated on

जळगाव : साकेगाव (ता. भुसावळ) येथील नाभिक समाज बांधव सुरेश रामा खंबायत यांचा मोठा मुलगा योगेश यांचे दीड वर्षापूर्वी कोरोना (Corona) काळामध्ये निधन झाले होते. या घटनेने खंबायत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. योगेशच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी आहे. घरात दुःखद वातावरण होते. काही नातेवाईक, समाज बांधव व गावातील ज्येष्ठ मंडळीच्या पुढाकाराने योगेश याचा लहान भाऊ अनिल सुरेश खंबायत याने वहिनीसह दोघा मुलांचे संगोपन व पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली अन् परिवाराला एक आनंदाची उमेद आली.

साकेगाव येथे दत्त मंदिरात काही ठराविक समाज पदाधिकारी नातेवाईक व गावातील जेष्ठ मंडळींच्या उपस्थितीत अनिल सुरेश खंबायत, दुर्गा भाऊसाहेब वैद्य या दोघांचा लग्न सोहळा आनंदात पार पडला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, जिल्हा सहकार्याध्यक्ष किशोर वाघ, अखिल भारतीय नाभिक सेना समाज सचिव राजकुमार गवळी, प्रकाश भास्कर बरडे, मुलाचे वडील- सुरेश खंबायत आई- सुनंदा खंबायत, मुलीचे वडील- भीमा वैद्य, आई- रंजना वैद्य (रा. कापूस, वडगाव, वैजापूर, जि.औरंगाबाद) येथील नातेवाईक व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

Marriage
तो‘ वैवाहिक बलात्कार मानावा का, याबाबत न्यायमूर्तींतच मतभिन्नता
Marriage
3 स्टार हॉटेलात 2 महिने जेवणासह रिचवली दारू; पैसे मागताच पसार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.