Jalgaon News : अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटविले

Burn Women Case
Burn Women Caseesakal
Updated on

भडगाव : अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.२३) घडली. या प्रकरणी पोलिसात ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ओमशांती केंद्राच्या मागे बुधवारी (ता.२३) तीनच्या सुमारास ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीने ४७ वर्षीय पीडित विवाहितेचा हात पकडून अश्लील संवाद करत लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला. (Married Woman Set on fire as soon as she protested excess Jalgaon Crime News)

Burn Women Case
Jalgaon News : थंडीत उर्जेसाठी खा सुकामेवा

पीडित महिलेने विरोध करताच तिला आगपेटीने पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंगात चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पँट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णनाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव भाग) रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक (चाळीसगाव) अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव पाटील, निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, जळगाव फॉरेन्सिक टिम आदींनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनीही तपासाला वेग दिला आहे. सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Burn Women Case
Jalgaon District Milk Union Election : दूध संघ वाचविणे हेच आमचे ध्येय : गुलाबराव पाटील

भडगावकर हादरले

दोन दिवसांपूर्वी ही महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. मात्र तेव्हा ही घटना कशी घडली, हे समोर आले नव्हती. पण अतिप्रसंगाला विरोध केल्याने त्यांना जाळण्यात आल्याची घटना समोर आल्याने भडगावकर या घटनेने हादरले आहेत. ही घटना ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या भडगावसाठी काळिमा भासणारी असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पोलिसांनी तातडीने गैरकृत्य करणाऱ्याला शोधून काढण्याची मागणी होत आहे.

Burn Women Case
Jalgaon Milk Union Fraud : संशयितांना जिल्हा न्यायालयाचा जामीन; दूध संघ आवारात जाण्यास मनाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.