Jalgaon News : एकीकडे कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत खटला अन्‌ दुसरीकडे मृत्युशी झुंज..! कॅन्सरग्रस्त पीडिता न्यायालयात

Aggrieved married woman who entered the court in an ambulance on Wednesday for the pending case.
Aggrieved married woman who entered the court in an ambulance on Wednesday for the pending case.esakal
Updated on

Jalgaon News : पुण्यातील रहिवासाचा देखावा करत, हुंडा घेऊन तीन आठवड्यातच लग्न लावून घेत मध्य प्रदेशातील एका कुटुंबाने जळगावातील सुखवस्तू घरातील मुलीची फसवणूक केली. लग्नानंतर अतिरिक्त हुंड्याची मागणी करुन छळ केला.

पत्नीला चार वर्षांच्या मुलीसह घराबाहेर काढले. पीडितेने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेस कॅन्सरचे निदान झाले व त्यावरील महागडे उपचार परवडत नाही म्हणून न्यायासाठी या महिलेने रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर येत न्यायालयाला साकडे घातले. (married woman suffering from cancer reached court on stretcher for justice jalgaon news)

बुधवारी (ता. १३) दुपारी अकराच्या सुमारास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील न्या. श्रीमती जसवंत यांच्या न्यायालयात घडलेल्या या प्रकाराने प्रत्यक्षदर्शीही हळहळले.

जळगावातील एका सुखवस्तू कुटुंबातील मुलीची ही कहाणी. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत येथील दिवाणी न्यायालयात पीडितेने खटला दाखल केला आहे. खटला प्रलंबित असून, याचदरम्यान पीडितेस कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सर गंभीर टप्प्यात असून, अशा वेगळ्या स्थितीत उपचाराचा खर्च पतीने करण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Aggrieved married woman who entered the court in an ambulance on Wednesday for the pending case.
Road Construction : रस्त्यांची प्रलंबीत कामे आजपासून सुरू; महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आपआपले रस्ते करणार

दिल्ली न्यायालयाने अनुरिता व्होरा व संदीप व्होरा यांच्या खटल्यात निकाल देताना स्थिती बदलाच्या संदर्भात अशाप्रकारे निर्देश दिले जाऊ शकतात, सर्वोच्च न्यायालयातील रजनीश व नीथा यांच्या खटल्यात गंभीर आजारावरील खर्च देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

या निर्देशांद्वारे आजारी पत्नीच्या उपचारावरील खर्च पतीने तत्काळ करण्याची त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचे म्हटले असून, तीन-चार महिन्यात निर्णय घेण्याचे बंधनही सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे.

त्याच आधारे जळगावातील या कॅन्सरग्रस्त पीडितेने उपचारावरील खर्चासाठी न्यायालयाकडे याचना केली आहे. त्यासाठी पीडिता स्वत: रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर झाली.

Aggrieved married woman who entered the court in an ambulance on Wednesday for the pending case.
Raksha Khadse News : सासऱ्यांविरुद्ध लढण्याची रक्षा खडसेंची तयारी; कौटुंबिक संबंध असतानाही परिस्थिती स्वीकारार्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.