Jalgaon News : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात एका २२ वर्षीय विवाहितेची सिजर प्रसूती झाली.
मात्र हे गर्भ अविकसित असून, एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत व्यंगात्मक पद्धतीने सयामी जुळे होते. त्यामुळे काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तत्काळ सिजर प्रसुती करून महिलेला दिलासा देण्यात आला.
एरंडोल तालुक्यातील ही विवाहिता गरोदर असल्याने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आली होती. (Married Women gave birth to Siamese twins undeveloped woman get cervical relief at GMC Jalgaon News)
तेथे सोनोग्राफी केली असता, तिच्या पोटात पाच महिन्याचा अविकसित गर्भ, त्यातही दोन बाळे सयामी, एकमेकांना जुळलेली अशा व्यंगात्मक परिस्थितीत सोनोग्राफीमध्ये आढळून आली. त्यामुळे स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांनी तत्काळ तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला.
तिच्या शरीरात ६ हिमोग्लोबिन एवढेच रक्त होते. दोन थैल्या रक्त चढविल्यानंतर अविकसित गर्भ बाहेर काढण्यासाठी सिजर प्रसूती करण्यात आली.
प्रसुती दरम्यान सदर महिलेच्या पोटातून एकमेकांना जुळलेले व्यंगात्मक पद्धतीचे सयामी जुळे असलेले दोन बाळ वैद्यकीय पथकाने बाहेर काढले. मात्र, काही क्षणांतच ते दगावले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर महिलेवर औषधोपचार करून प्रकृती आता स्थिर आहे. महिलेला दिलासा देण्याकामी स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. संजय बनसोडे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. राहुल कातकाडे, डॉ. विनेश पावरा, डॉ. रणजीत पावरा, डॉ. अमृता दुधेकर, डॉ. पूजा बुजाडे, डॉ. पूजा वाघमारे, इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या स्टाफने सहकार्य केले. सदरहू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल, तसेच रुग्णाला दिलासा दिल्यामुळे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
"रुग्णालयात सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ही दुर्मिळ घटना आहे. सदरहू मृत बाळांचे शव हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागांमध्ये ठेवण्यात येत आहे."
-डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जीएमसी, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.