जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसांत अडीचशे जणांचा मृत्यू

एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांचे सरासरी प्रमाण बाराशेच्या आसपास होते.
corona deth
corona dethcorona deth
Updated on

जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने मार्चमध्ये व आता एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातही तीव्रता कायम ठेवली आहे. या महिन्याच्या गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात १७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले, तर अडीचशे रुग्णांचा बळी गेला.

corona deth
सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन..आणि थेट कॅनडातून रुग्णांना मिळाला प्राणवायू

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत आहे. मार्च व एप्रिल महिन्यांत लाटेची तीव्रता जाणवत असून, गेल्या तीन आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अकराशे, बाराशेच्या घरात आहे.

corona deth
कोरोनाचा कहर सुरच; सलग दुसऱ्या दिवशी २० जणांचा मृत्यू

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले अधिक

मार्च व एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर मोठा होता. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांचे सरासरी प्रमाण बाराशेच्या आसपास होते. या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १७ हजार २१२ रुग्णांची भर पडली. मात्र, या स्थितीत दररोज बरे होणाऱ्यांची संख्याही नव्या बाधितांएवढी, तर काही दिवशी ती जास्तही होती. त्या मुळे गेल्या १५ दिवसांत तब्बल १७ हजार ३२३ रुग्ण बरे झालेत.

अडीचशे बळी

कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा दर जसा जास्त आहे तसा मृत्युदरही अधिक आहे. दररोज १५ पेक्षा जास्त मृत्यू होत असून, गेल्या दोन दिवसांत हा आकडा वीसच्या वर गेला आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात २४२ बळी गेले.

corona deth
कसं होणार ! संचारबंदीतही नागरिक रस्त्यावरच

सक्रिय रुग्णसंख्याही वाढली

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारांवर गेली नव्हती, ती आता पार करून गेली. सर्वाधिक सक्रिय रुग्ण १३ तारखेला नोंदले गेले. १३ एप्रिलला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ८२३ होती. सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून नवीन बाधित कमी व बरे होणारे अधिक असल्याने सक्रिय रुग्ण थोडे कमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()