Jalgaon News : परिसरातील विशेषतः गिरणा नदीच्या पट्ट्यातील भागात रविवारी (ता. ४) सुमारे पंधरा मिनीटे झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते केले.
जामदा व भऊर शिवारात दहा मिनिटे गारा पडल्या तर जवळपास वीस मिनिटे वादळी पाऊस झाला. ज्यामुळे केळी बागेसह अनेक शेतांमधील पिकांचे नुकसान झाले.
अनेक भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी रस्ता बंद झाला होता. (Maximum damage in Jamda area trees along roads uprooted along with fields Thunderstorm in Girnar area Jalgaon News)
वादळाच्या या तडाख्यात गिरणा परिसरात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जामदा व भऊर (ता. चाळीसगाव) भागात वादळी पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. जामदा गावातील भरावाच्या पलीकडच्या भागात मोठे नुकसान झाले.
दुपारी दीडच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. केवळ पाच मिनीटे बारीक गार पडली. त्यानंतर मात्र आलेल्या वादळाची तीव्रता इतकी भीषण होती, की काही क्षणातच पिके जमिनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले.
शेतांमध्ये झाडे पडली
जामदा भागात बहुतांश शेतांमध्ये झाडे आहेत. यातील बरीच झाडे शेतातच उन्मळून पडली. काही शेतांमध्ये शेतकरी व शेतमजूर देखील होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी पिकांचे मोठे नुकसान झाले.
रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे देखील पडल्याने शेत शिवारातील रस्ते बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच हाल झाल्याचे दिसून आले. या भागात आंब्यांची मोठमोठी झाडे उन्मळून पडली.
जोरदार वादळाच्या तडाख्यात अनेक आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या पडल्याने झाडांखाली कैऱ्यांचा ढीग जमा झाल्याचे चित्र अनेक भागात दिसून आले. येथील दिलावर पठाण या शेतकऱ्याच्या मालकीची आंब्यांची झाडे पडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
जामदा (ता. चाळीसगाव) येथील प्रगतीशील शेतकरी ठाणसिंग पाटील यांचे शेतच जणू वादळाचे केंद्रबिंदू होता. इतरांपेक्षा त्यांच्या शेतीला वादळाचा मोठा तडाखा बसला. शेतातील कांदा चाळीवर लिंबाचे भले मोठे झाड पडले.
याशिवाय याच शेतात सुमारे तीस वर्षांपासून श्री. राजपूत यांनी जतन केलेली आंब्यांची चार झाडे उन्मळून पडली. त्यांच्याच शेतात कापणीला आलेल्या चार एकरवरील केळीची सुमारे पाचशे झाडे वादळात जमिनदोस्त झाली.
नुकत्याच लागवड केलेल्या टिशू कल्चर केळीवर छोटी झाडे व फांद्या पडल्याने सुमारे शंभर ते दीडशे केळीच्या लहान रोपांचे नुकसान झाले आहे.
"अगोदरच अनेक वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आजच्या वादळाने तर हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावून घेतला आहे. यावेळी चांगले पीक येण्याची शक्यता होती. मात्र,आचानक आलेल्या वादळी पावसामुळे आमचेच सर्वाधिक नुकसान झाले. आजोबा व वडिलांनी जतन केलेली झाडेही उन्मळून पडली."
- सुभाष पाटील, शेतकरी ः जामदा (ता. चाळीसगाव)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.