Jalgaon News : रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणार; महापौर, उपहापौरांचे आदेश

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.esakal
Updated on

Jalgaon News : पावसामुळे शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पाण्याचा ताबडतोब निचरा करण्याचे काम मंगळवार (ता.२५)पासून सुरू होणार आहे.

याबाबत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बैठक घेऊन आदेश दिले. (Mayor Deputy Mayor order to drain water accumulated on road jalgaon news)

शहरातील अनेक भागांत पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत आहे. पाण्याचा निचरा करण्याबाबत सोमवारी (ता. २४) महापौर महाजन व उपमहापौर पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

त्यांनी शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेल्या ठिकाणाची माहिती घेतली. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याबाबत कशा उपाययोजना करण्यात येतील, याचीही चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Jalgaon ZP CEO : तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट क्लासरूम करण्यावर भर : सीईओ अंकित

पाईप टाकून, गटारी काढून निचरा

ज्या भागात पाणी साचले आहे, त्या ठिकाणी पाईप टाकून किंवा गटारी तयार करून ताबडतोब पाण्याचा निचरा करण्यात येणार आहे. बिबानगर भागात नाल्याचे पाणी साचत असल्याने तेथे मोठे पाईप टाकून तातडीने पाण्याचा निचरा करण्यात येणार आहे. याशिवाय शिंदेनगर भागातही उपाययोजना करण्यात येणार आहे.

गटारीद्वारे निचरा

शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रामाणात पाणी साचले आहे. गटारी नसल्याने त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. त्या ठिकाणी छोटे पाइप टाकून किंवा गटारी तयार करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, आरोग्याधिकारी उदय पाटील व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Snake Bite News : दिवसा नागरिकांना होणारे 85 टक्के सर्पदंश ‘विषारी’; वन्यजीव संरक्षण संस्थेचा निष्कर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.