Jalgaon Yuvarang Festival : खानदेशी जेवणाची चव न्यारीच, असे म्हटले जाते. या खानदेशी भोजनाच्या फोडणीचा तडका मु. जे. महाविद्यालयात सुरू असलेल्या युवारंग महोत्सवात दिला जात आहे. येथे आलेल्या विद्यार्थी कलावंतांसह संपूर्ण टीमला भरीत-पुरी, शेवभाजी असे बरेच खानदेशी जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पाचदिवसीय महाविद्यालयीन युवारंग महोत्सव जळगावातील मु. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू झाला आहे. (Meals for 2 thousand people are prepared at time jalgaon yuvarang festival news)
दर वर्षी भरविण्यात येत असलेल्या या महोत्सवात विद्यार्थी आपली कला सादर करतात. मुख्य म्हणजे सहभागी कलावंतांना येथेच राहण्याची व जेवणाची सुविधा असते. अशीच सुविधा, पण या वर्षी जरा वेगळेपण दाखविणारी व्यवस्था मु. जे. महाविद्यालयात आहे.
यंदा प्रथमच रोज मिष्टान्न
युवारंग महोत्सवात सहभागी कलावंत व त्यांची सपोर्ट टीमसाठी दोन्ही वेळेस जेवणाची सोय असते. पाच दिवसांच्या या महोत्सवात आतापर्यंत पहिल्या व शेवटच्या दिवशी गोड पदार्थ दिला जात असे. यंदा प्रथमच पाचही दिवस मिष्टान्न दिले जात आहे. शिवाय जेवणात खानदेशी मेनू आहे. यात शेवभाजी, भरीत-पुरी, मटर-पनीर, छोले भटुरे, डाळ-भातचे जेवण दिले जात आहे. एका वेळेस दोन हजार जणांचे जेवण तयार केले जात आहे.
राहण्यासाठी स्वतंत्र सुविधा
महोत्सवात विद्यार्थी कलावंतांसह व्यवस्थापकीय टीम मेंबर मिळून साधारण एक हजार ५२० जण आलेले आहेत. या सर्वांसाठी राहण्याची सुविधादेखील आवारात करण्यात आली आहे. यात ८२० विद्यार्थिनींसाठी लेडीज हॉस्टेलमध्ये, तर उर्वरित विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी स्वामी विवेकानंद भवन येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. येथे २८ बाथरूमसह २८ अतिरिक्त टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाश्त्यासोबत फ्रूटसलाड
दोन वेळच्या जेवणात यंदा प्रथमच दोन्ही वेळेस गोड दिले जात आहे. तसेच, सहभागींना नाश्त्याची व्यवस्थादेखील यंदा प्रथमच करण्यात आली आहे. यात पोहे, उपमा, आलूवडे अशा नाश्त्यासोबत केळी, सफरचंद, काकडी यासारखे फ्रूटसलाड दिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.