BJP Meeting News : भाजपकडून सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’

Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.
Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.esakal
Updated on

Jalgaon News : गेल्या नऊ वर्षांत देशातील विकासाचे चित्र पार बदलून गेलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोचविणाऱ्या योजना दिल्यात, त्याची प्रभावी अंमलबजावणीही केली.

प्रत्येक घरात केंद्र सरकारच्या योजनेचा लाभार्थी आहे. ही कामे, योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवा, असा मंत्र भाजप नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. ९) दिला. (Meeting of social media officials from BJP Focus on youth Don't waste year and a half now Bring Modi's works to masses Jalgaon News)

मोदी सरकारच्या नऊ वर्षे पूर्तीनिमित्त ब्राह्मण सभेत ‘मोदी @9 सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर’ अंतर्गत सोशल मीडिया हाताळणारे पदाधिकारी व विविध आघाड्यांचे कार्यकर्त्यांची बैठक झाली. कर्नाटकचे माजी मंत्री अरविंद लिंबावली प्रमुख पाहुणे होते.

व्यासपीठावर खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सोशल मीडिया सेलचे प्रकाश गाडे, दीपक जगताप, प्रदेश चिटणीस अशोक कांडेलकर, अजय भोळे, महिला आघाडीच्या रेखा पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्‍याम चौधरी, मधु काटे, ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर आदी उपस्थित होते.

Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.
Jalgaon Crime News : घरखर्चाला पैसे देत नसल्याने पोटच्या मुलांनीच केला बापाचा खून

विरोधात ‘नॅरेटिव्ह’

प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. नंतर श्‍यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. या बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सोशल मीडिया सेलचे प्रमुख प्रकाश गाडे म्हणाले, की २०१४ मध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारा एकमेव पक्ष भाजप होता.

त्या आधारे आपण आपले विचार, अजेंडा व मोदींचे ब्रॅन्डिंग करू शकलो. आता सर्वच विरोधी पक्ष सोशल मीडियाचा वापर आपल्यापेक्षाही अधिक परिणामकारक पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.

मोदी सरकारची कामे, योजना तसेच आपल्या विचारधारेशी अगदी विरोधात ठराविक पोस्ट व्हायरल करत ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा अजेंडा राबविला जात आहे. त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण सजग व सज्ज असले पाहिजे. मोदी सरकारच्या योजना, कामे सर्व घटकांपर्यंत पोचविण्याचे काम सोशल मीडियाद्वारे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.
Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी बैठकीच्या आयोजनाची माहिती दिली. मोदी सरकारच्या ९ वर्षे पूर्तीनिमित्त देशभरात हा कार्यक्रम राबविला जात असून, या अंतर्गत ३० जूनपर्यंत प्रत्येक लोकसभा क्षेत्रात, अशा प्रकारच्या बैठकी होणार आहेत. आपल्या जिल्ह्यात आपण याद्वारे घराघरापर्यंत आपली कामे, विचार पोचवायचे आहेत, असे ते म्हणाले. मधु काटे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक सूर्यवंशी यांनी आभार मानले.

दीड वर्ष रिकामे बसू नका

""सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी असूनही आपल्यातील बरेच कार्यकर्ते सोशल मीडियावर फारसे ॲक्टिव्ह नाहीत, हे बरोबर नाही. माझे स्वत:चे ७ लाख ५६ हजार फेसबुक फॉलोअर्स आहेत. कारण मी मोदींचा फॉलोअर आहे.

आपण सर्वांनी मोदींना फॉलो करावे, त्यांचे ट्वीट, सरकारची कामे, व्हिडिओ, आपल्या नेत्यांची भाषणे पॉडकॉस्ट करावीत. तरुणांना आकर्षित करून त्यांना पक्ष, आपल्या विचारांशी जोडून घ्यावे. येणाऱ्या लोकसभा व आपल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे दीड वर्ष आता रिकामे बसू नका. कामाला लागा.""

-अरविंद लिंबावली, माजी मंत्री, कर्नाटक

Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.
Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

रेल्वेचीच ८ हजार कोटींची कामे

""मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेल्या ७० वर्षांत जी कामे होऊ शकली नाहीत, ती या ९ वर्षांत झाली आहेत. रेल्वे, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या. या वर्षांत भुसावळ विभागात रेल्वेचीच सुमारे ८ हजार कोटींची कामे झालीत. उज्वला गॅस, आयुष्मान भारत, जलजीवन मिशन, पोकरा, किसान सन्मान यांसह अनेक योजनांचे लाखोंच्या संख्येत लाभार्थी आहेत. या योजनांचे यश, विकास व प्रगतीची कामे जनतेपर्यंत पोचवा.""

-उन्मेश पाटील, खासदार, जळगाव

काम केलीत, म्हणून सांगतोय

""गेल्या ९ वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील सर्वस्तरातील नागरिकांसाठी, प्रत्येक घटकांसाठी चांगल्या योजना राबविल्या. प्रत्येक योजनेचा घराघरांत लाभ झाला आहे. मोदींनी कामे केली, मग सभा घेण्याची काय गरज, असे विरोधक आम्हाला विचारतात. मात्र, आम्ही कामे केली, म्हणून सांगू शकतो. विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. कारण त्यांनी इतकी वर्षे काही केलेले नाही. त्यामुळे मोदी सरकारची कामे सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोचवा.""

-रक्षा खडसे, खासदार, रावेर

Jalgaon: Former Karnataka minister Arvind Limbavali spoke at the BJP social media cell meeting held at Brahmin Sabha on Friday. Officials on stage.
Dhule Crime News : मुलीसोबतच्या भांडणामुळे जावयास बेदम मारहाण; सासरा-मेहुण्यांना जन्मठेप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.