पाचोऱ्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त भेटीला उजाळा

Eknath Shinde & Kishor Patil
Eknath Shinde & Kishor Patilesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे प्रभावी नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shiv sena) आमदारांना सोबत घेत बंडखोरी उघड केल्याने व त्यांच्यासोबत आमदार किशोर पाटील हेही असल्याने श्री. शिंदे यांच्या पाचोरा येथील नवस फेडण्यासाठी झालेल्या गुप्त भेटीच्या चर्चेला उजाळा मिळाला आहे. (memory of secret meeting of Minister Eknath Shinde in Pachora with mla kishor patil jalgaon news)

मंत्री एकनाथ शिंदे १९ ऑक्टोबरला येथील राममंदिरात आले होते. हा दौरा कमालीचा गुप्त ठेवला होता. राममंदिरातील पुजारी गजेंद्र यांच्याकडून त्यांनी काही ग्रहांची शांती करून त्यांचा सल्लाही घेतला होता. त्यावेळी आमदार किशोर पाटील व त्यांचे जीवलग मित्र मुकुंद बिल्दीकर यांची शिंदे यांच्यासोबत बंदद्वार चर्चा झाली होती. या भेटीप्रसंगी पाचोरा- भडगाव मतदारसंघातील विकासकामांचा आढावा शिंदे यांनी घेतला होता. आमदार किशोर पाटील यांनीही कामांचा लेखाजोखा त्यांच्याकडे मांडला होता. याव्यतिरिक्त त्यांच्यात काय चर्चा झाली, हे त्यावेळी समजू शकले नव्हते.

Eknath Shinde & Kishor Patil
सेना, कॉंग्रेस आमदारांच्या बैठक; भाजप सरकार लवकरच...

मात्र, नवस फेडण्याच्या उद्देशाने झालेल्या या गुप्त भेटीप्रसंगी एकनाथ शिंदे सुमारे दोन तास राममंदिर परिसरात होते. त्याचवेळी आमदार किशोर पाटील यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले निकटचे संबंध स्पष्ट झाले होते. या दौऱ्यानंतर नगरविकास खात्याकडून पाचोरा व भडगाव शहरातील कोट्यवधी विकासकामांचा श्रीगणेशा आमदार किशोर पाटील यांनी केला. आता शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये आमदार किशोर पाटील यांचाही समावेश असल्याने शिंदे यांच्या त्या गुप्त भेटीच्या चर्चेला उजाळा मिळाला आहे. यानिमित्त दोघांच्या त्या भेटीची चर्चा शहरात सध्या चांगलीच रंगली आहे.

Eknath Shinde & Kishor Patil
Nashik : इ-चलन केले म्हणून पोलिसावर रॉडने हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()