चोपडा तालुक्यात ११७ एकरमध्ये होणार‘एमआयडीसी’ प्रकल्प

lata sonwane
lata sonwane
Updated on

जळगाव : चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे शासनाने २७ हेक्टर क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर केले असून याआधीची एमआयडीसीची २० हेक्टर जागा त्यात समाविष्ट केल्याने एकूण ४७ हेक्टर म्हणजेच ११७ एकर जागेत एमआयडीसी विकसित होणार आहे, अशी माहिती चोपड्याच्या आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली. 

आर्वजून वाचा- एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांच्या शिधापत्रिका होणार रद्द 

यासंदर्भात आज पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा. सोनवणे म्हणाले, गेल्या टर्ममध्ये आमदार असताना सन २०१५ पासून आपण चहार्डी येथे औद्योगिक क्षेत्र जाहीर व्हावे म्हणून प्रयत्नशील होतो. औद्योगिक व पर्यावरण मंत्रालयाशी त्याबाबत वारंवार प्रयत्न करण्यात आले. 

याआधीच याठिकाणी एमआयडीसीच्या ताब्यात २० हेक्टर ७५ आर जागा होती. त्यामुळे या जागेला लागून आणखी २७ हेक्टर २३ आर शासनाच्या ताब्यातील अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्याबाबत पाठपुरावा सुरु केला. दरम्यानच्या काळात व्यक्तिगत अडचणींमुळे हा विषय मागे पडला. 

पुन्हा पाठपुरावा सुरु 
२०१९ला पत्नी आमदार झाल्यानंतर पुन्हा या कामासाठी पाठपुरावा सुरु केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ही जागा दाखवून त्यांनीही त्याचे सर्वेक्षण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या जागेस औद्योगिक क्षेत्र म्हणून नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्याबाबतची अधिसूचनाही जारी झाली आहे. 

दोन उद्योगांची विचारणा 
१२ तारखेपासून याठिकाणी जागेची मोजणी सुरु होईल. उद्योग केंद्र कार्यान्वीत होण्याआधीच याठिकाणी उद्योग उभारण्याबाबत दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्याशी संपर्क केला आहे. मक्यापासून तयार होणारी खाद्य उत्पादने तसेच बांबूपासून सीएनजी तयार करण्यासंबंधी उद्योग येथे येण्यास इच्छूक असल्याचे प्रा. सोनवणे यांनी सांगितले.  

कृषिपूरक उद्योगांवर भर 
आपला जिल्हा विशेषत: कृषिवर निर्भर आहे. कापूस, मका, केळी ही इथली मुख्य उत्पादने. त्यामुळे या एमआयडीसीत कृषि पूरक उद्योग यावेत, यावर आपला भर आहे. जिल्ह्यातील व बाहेरील उद्योगांनी याठिकाणी उद्योग उभारावे, असे आवाहन आमदार लता सोनवणे यांनी केले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.