Jalgaon News : जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची होणार मोजणी; तपासणीसाठी ETS पथक दाखल

Officers of 'ETS' during inspection of minor mineral wharves.
Officers of 'ETS' during inspection of minor mineral wharves.esakal
Updated on

जळगाव/मुक्ताईनगर : जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची नाशिक विभागीय कार्यालयाच्या पथकाकडून ‘ईटीएस’ प्रणालीद्वारे मोजणी केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. या मोजणीसाठी २४ कर्मचारी आणि तीन अधिकारी जिल्ह्यात दाखल असून, पथकाकडून मुक्ताईनगरातील गौण खनिज घाटांचीही मोजणी केली जाणार आहे. (Mining belts in district will counted ETS team admitted for inspection Jalgaon News)

वर्षभरात गौण खनिजाचे नेमके किती आणि कसे उत्खनन झाले आहे? याची माहिती घेण्यासाठी विविध जिल्ह्यातील पथकांद्वारे घाटांची मोजणी केली जाते. ही मोजणी करण्यासाठी ईटीएस या प्रणालीचा वापर केला जातो.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने जळगाव जिल्ह्यातील गौण खनिजाच्या घाटांची मोजणी करण्यासाठी २४ कर्मचारी आणि तीन अधिकारी असे २७ जणांचे पथक नेमले असून, या पथकाकडून घाटांची मोजणी सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

या गौण खनिजाच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागालाही आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील घाटांच्या मोजणीचा अहवाल हा त्या-त्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Officers of 'ETS' during inspection of minor mineral wharves.
Nashik News : उद्यानांची दुरवस्था टवाळखोरांच्या पथ्यावर; खेळणी, ग्रीन जिम साहित्यांची मोडतोड

आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात गौण खनिजाचा ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिजाच्या घाटांचीही मोजणी पथकाकडून केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या पथकात तन्मय साळवे, चेतन मानकर, राजाराम खामकर, बाळू थिटे, जिल्हा गौण खनिकर्म प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, संदीप पाटील, सचिन जाधव, विजय भोये, विराज कर्डक, अमोल नागरे, अमित लोंढे, नितीन अहिरे, अक्षय जाधव, यांच्यासह भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक पंकज फेगडे, संजय राजपूत, राहुल पाटील यांचा समावेश आहे.

Officers of 'ETS' during inspection of minor mineral wharves.
Citylinc Fare Hike : नव्या वर्षात शहर बससेवेत 7 टक्के दरवाढ; पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()