Eknath Khadse Anil Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राज्यातील जिल्हा प्रभारींची नावे जाहीर केली आहेत.
त्यात, अजित पवार गटातर्फे खान्देशची जबाबदारी मंत्री अनिल पाटील यांना, तर शरद पवार गटातर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी निकटचे मानले जाणाऱ्या दोघांचा खरा आमना- सामना होणार आहे. (minister and ex ministers of NCP are now in face to face competition jalgaon news)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे साथ देत आहेत. अजित पवार गटाची राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
त्यात जळगांव, धुळे, नंदुरबार हा खानदेश भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर, शरद पवार यांच्या गटातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा प्रभारींच्या यादीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जळगांव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे.
या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट करावयाचा आहे. त्यांचा आता खऱ्या अर्थाने कसं लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकेकाळी भाजपमध्ये असताना ते एकमेकांचे अत्यंत निकटचे मानले जात होते.
अनिल पाटील यांना त्या काळात खडसे यांच्या गटाचे मानले जात होते. आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर खानदेशात या दोघांतच सामना होणार असून, त्यांनी एकमेकांविरुद्ध तोफा डागणे सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.