Water Issue : गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा.
जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड दिला आहे. अशा गावांमध्ये पाणी, चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. ( Minister Anil Patil instruct to Arrange water fodder in shortage affected villages jalgaon news)
जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ. प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे अद्याप मदत न मिळालेल्या २०२०-२१ पासूनच्या प्रलंबित मदतीचा आढावा घेण्यात येऊन मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यात यावा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी.
या दिल्या सूचना
- ज्या गावांमधून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी येईल. अशा ठिकाणी टँकर मंजूर करत पाणी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे.
- गावामध्ये पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक ठरविण्यात यावे.
- पाणी पुरवठ्यामध्ये नागरिकांची तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी
- जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ज्या आपत्तीचे सौम्यीकरण करायचे आहे, अशा आपत्ती सौम्यीकरणाचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्यात यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.