Jalgaon Anil Patil : नेत्यांनी माघार घेतली नसती, तर त्याचवेळी.... मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य

anil patil
anil patilesakal
Updated on

Jalgaon Anil Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय २०१९ मध्येच घेतला होता. (minister anil patil statement about going with bjp in 2019 jalgaon news)

मात्र, त्यावेळी नेत्यांनी माघार घेतली नसती, तर त्याच वेळी आम्ही सत्तेत राहिलो असतो, असे मत राज्याचे मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले. मंत्रिपदानंतर प्रथमच जळगावात आल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल भाईदास पाटील शुक्रवारी (ता. ७) जळगाव जिल्ह्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, की आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी कोणतीही अपेक्षा नव्हती. अजित पवार यांनी आपल्याला राजकीय जीवदान दिल्याने त्याची परतफेड करावी, हेच आपले ध्येय होते. मात्र, आपल्याला अनपेक्षितपणे त्याचा लाभ झाला.

अमळनेरसारख्या लहान शहराला प्रथमच हा मान मिळाला आहे. आपण जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले, की अडीच वर्षात निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाला गती मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

anil patil
Nashik Sharad Pawar : शरद पवार आज येवल्याच्या रणांगणात; पक्ष सोडून गेलेल्यांविरोधात फुंकणार रणशिंग

मंत्रिमंडळाच्या एक, दोन बैठकीतच पाडळसरे धरणाच्या ४ हजार ८८१ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली जाईल आणि केंद्राकडून निधी आणून दीड, दोन वर्षांत धरण पूर्ण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस रसातळाला चालला असल्याने पक्षाला उभारी द्यायची असेल, तर नवीन दमाच्या नेतृत्वाची गरज आहे, म्हणून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी नव्याने नियुक्त केले जातील, असे त्यांनी सांगितले.

ढोलताशांच्या गजरात स्वागत

मुंबई येथून सकाळी सातला रेल्वेने त्यांचे जळगावात आगमन झाले. या वेळी रेल्वेस्थानकावर ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, विनोद देशमुख आदी उपस्थित होते.

anil patil
Minister Anil Patil : कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व : मंत्री अनिल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.