Atul Save
Atul Saveesakal

Jalgaon News : ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज; सहकारमंत्री अतुल सावे

Published on

जळगाव : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी राज्य सरकार लवकच ‘पॅकेज’ मंजूर करणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. आमदार सुरेश भोळे यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ठेवीदारांच्या प्रश्‍नांची माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रश्‍नांची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रश्न गंभीर असून, २००७ पासून ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही. (Minister Atul Save Statement Return deposit Cooperation Package soon Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Atul Save
Jalgaon Crime News : चोपड्याच्या चोरट्यांकडे नाशिकच्या दुचाकी

संस्थांच्या वसुली होत असूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जात नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आपण अनेकवेळा पाठपुरावा करीत असल्याची माहितीही आमदार भोळे यांनी दिली.

सहकारमंत्री अतुल सावे यांनी ठेवीदारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर असून, लवकरच ठेवीदारांच्या मागण्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी पॅकेज मंजूर केला जाईल व ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्र्यांच्या या आश्‍वासनामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. आपण ठेवीदारांसाठी कायम पाठपुरावा करत आहोत, अशी ग्वाहीही आमदार भोळे यांनी दिली.

Atul Save
Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाळला मंत्री महाजनांचा पुतळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()