Jalgaon NMU News : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत जुन्याच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची घटना गंभीर आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीचा निकाल आला असून, COEMPT Eduteck Pvt. Ltd. Hydrbad या संस्थेकडून प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या सेवा रद्द करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिले. (Minister Chandrakant Patil statement about Cancelled service of institute selected for nmu exams jalgaon news)
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी २०२३ च्या परीक्षा एप्रिल २०२३ पासून विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या होत्या.
ऑक्टोबर २०२२ च्या परीक्षेपासून प्रथमच Online System द्वारे प्रश्नपत्रिका मागविणे (Question Paper Submission), प्रश्नसंचांची निवड करणे (Selection) आणि प्रश्नपत्रिका वितरित करणे (Distribution) ही कार्यप्रणाली कोविडनंतर प्रथमच वापरली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशी होती गंभीर चूक
व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ च्या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका मागील परीक्षेच्याच पाठविण्यात आल्याबाबत विद्यार्थी संघटनेकडून तक्रारवजा निवेदन विद्यापीठास प्राप्त झाले.
यामध्ये झालेली चूक लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिकहित विचारात घेऊन, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या ज्या पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका मागील परीक्षेच्याच पाठविल्या गेल्या होत्या, त्या पाच विषयांच्या परीक्षांचे विद्यापीठामार्फत पुन्हा आयोजन करण्यात आले व ही परीक्षा सुरळीत पार पडली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
यासंदर्भात चौकशीसाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत COEMPT Eduteck Pvt. Ltd. Hydrabad यांच्याकडील Online Question Paper submission and Question Paper Selection प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या सेवा त्वरित रद्द करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.