Girish Mahajan : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा : मंत्री गिरीश महाजन

Crop Damage Survey : शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.
Girish Mahajan News
Girish Mahajan Newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची तत्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. (Minister Girish Mahajan statement Make Panchnama of affected farmers immediately jalgaon news)

त्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी वडली (ता. जळगाव) येथे कृषी केंद्रास भेट देऊन रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.

कुऱ्हाड (ता. पाचोरा) गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.

कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून अहवाल २४ तासांत दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girish Mahajan News
Girish Mahajan : मृत महिलांच्या वारसांना वाढीव मदत; पालकमंत्री महाजनांची संवेदनशीलता

पावसाळी अधिवेशनात कायदा होणार

शेतकऱ्यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून, या अनुषंगाने १६ जुलैच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात विषय उपस्थित झाला.

बोगस बियाणे व खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असून, यासाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून, पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी जगताप, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद देशमुख, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Girish Mahajan News
Girish Mahajan : अखेर बहुप्रतीक्षीत खातेवाटप झाले! नाराजीवर भाजपनेते गिरीश महाजन म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.