Gulabrao Patil News : संभाव्य टंचाईग्रस्त गावांत मिशन मोडवर कामे करा; मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

gulabrao patil
gulabrao patilesakal
Updated on

Gulabrao Patil News : सध्या राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दहा जिल्ह्यांतील ३५० गावे आणि १३१९ वाड्यांवर ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावात व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे मिशन मोडवर सुरू करा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. (Minister Gulabrao Patil instructions to work on mission mode in possible shortage affected villages jalgaon news)

टंचाई कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशनचे दहा जिल्ह्यांतील अधिकारी या वेळी उपस्थित होते. तसेच, दहा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात दहा जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत. या जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी तेथील लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेऊन पुढील टंचाईसंदर्भात उपाययोजनांबाबत नियोजन करावे. आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gulabrao patil
Gulabrao Patil News : ‘आभा’ कार्ड रुग्णांसाठी आधारवड : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे. भविष्यात लागणाऱ्या टँकरसाठी पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. टंचाई सदृश गावात जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी या वेळी दिले.

या जिल्ह्यांत टँकर सुरू

राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांत सध्या ३५० गावे व १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

gulabrao patil
Jalgaon Gulabrao Patil : ‘साथी’ गुलाबराव पाटील अनंतात विलीन; हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.