जनतेच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही : गुलाबराव पाटील

राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच जळगाव जिल्ह्यात दाखल झाले.
Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal
Updated on

जळगाव : जनतेने आपल्याला खूप दिले आहे, विशेषत: धरणगावकरांनी आपल्यावर भरपूर प्रेम दिले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही, असे मत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले. राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच शनिवारी (ता. १३) जळगाव जिल्ह्यात दाखल झाले, त्यांचे धरणगावात जोरदार स्वागत करण्यात आले. (Latest Marathi News)

राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात दाखल झालेले मंत्री गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यांच्या ताफ्याच्या सुरवातीला तिरंगा रंगात रंगलेल्या जीपमध्ये माजी सैनिक स्वार झाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांचे चारचाकी वाहन त्यामागे पोलिस गाड्या आणि नंतर वाहनांचा ताफा, अशी भव्य स्वागतयात्रा निघाली धरणगाव तालुक्यात पहिल्यांदा लोणे-भोणे फाट्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Gulabrao Patil
Devendra Fadnavis : ‘खात कुठलं हे महत्त्वाचं नाही; तर चालवणारा योग्य व्यक्ती पाहिजे’

याप्रसंगी दीपक भदाणे, देविदास भदाणे गुरुजी, राजेंद्र भदाणे, प्रल्हाद पाटील, निंबा भदाणे, दीपक भदाणे, शुभम चव्हाण, समाधान पाटील, अमोल पाटील, रावसाहेब पाटील, शाहरुख पटेल यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील, तत्कालीन उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, तालुका प्रमुख गजानन पाटील, युवासेनेचे चेतन पाटील, पवन पाटील, अमोल पाटील, आबा माळी, संतोष महाजन, वाल्मीक पाटील, संजय चौधरी, रवींद्र कंखरे, दीपक भदाणे, विशाल महाजन, पिंटू कोळी, मच्छींद्र कोळी, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil
ITच्या धाडी जालन्यात, धडकी मात्र नाशिकमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.