Sakal YIN News : देशभरातील तरुणाईसाठी ‘गांधी तीर्थ’ प्रेरणादायी स्थळ; ‘यिन’ शॅडो कॅबिनेट सदस्यांची भावना

Members of the 'Sakal-yin' Shadow Cabinet present during the visit to the 'Gandhi Tirtha'.
Members of the 'Sakal-yin' Shadow Cabinet present during the visit to the 'Gandhi Tirtha'. esakal
Updated on

Sakal YIN News : ‘सकाळ यिन’ शॅडो कॅबिनेट दौऱ्यात सहभागी झालेले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकाऱ्यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला.

जगविख्यात गांधी तीर्थला भेट दिल्यावर ‘प्रेरणादायी’ अशी प्रतिक्रिया या भेटीतून व्यक्त झाली. आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्याशी झालेल्या चर्चेतून आजच्या राजकीय स्थितीवर तरुणांनी मंथनही केले.

‘सकाळ-यिन’च्या शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्री आचल डवले, उपमुख्यमंत्री काजल चव्हाण, स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बाजीराव शिंदे, विरोधी पक्ष सदस्य तथा सामाजिक समिती अध्यक्ष विश्वभूषण पाटील आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते. (Ministers CM Deputy CM and colleagues who participated in Sakal Yin Shadow Cabinet tour toured district jalgaon news)

धुळे जिल्हाध्यक्ष तथा स्त्री समिती कार्याध्यक्ष पूर्वा अहिरराव, धुळे जिल्हा सरचिटणीस जागृती पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष भावेश पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, जळगाव जिल्हा संघटनमंत्री मयूर अलकरी, जळगाव जिल्हा विधानसभा अध्यक्ष मयूर कोळी, कोअर टीम अध्यक्ष शर्वाय श्रावगे, ऋतिक कोचुरे व खानदेशचे ‘यिन’ समन्वयक वैभव कुशारे उपस्थित होते.

‘गांधी तीर्थ’ला भेट

या सर्व सदस्यांनी जैन हिल्स येथील पवित्रस्थळ गांधी तीर्थला भेट दिली. गांधीजींनी उपयोगात आणलेल्या वस्तू, साहित्याचे त्यांनी निरीक्षण केले. या वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालयात महात्मा गांधींचा जीवनपट, त्यांचे चरित्र, त्यांनी जीवनात अमलात आणलेल्या सूत्रांबद्दल ‘यिन’ सदस्यांनी माहिती घेतली. या भेटीतून वेगळी प्रेरणा घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.

आमदारांनी साधला संवाद

नंतरच्या सत्रात ‘यिन’ मंत्रिमंडळ सदस्यांनी जळगाव शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. श्री. भोळे यांनी त्यांच्याशी संवाद साधत सध्याच्या राजकीय स्थितीवर विस्तृत चर्चा केली. राजकारणातील करिअरवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Members of the 'Sakal-yin' Shadow Cabinet present during the visit to the 'Gandhi Tirtha'.
NMU MSW Entrance Exam : ‘एमएसडब्ल्यू’ प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल; आता 30 ऐवजी या तारखेला

‘सकाळ यिन’ शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळातील सदस्यांशी भेट झाली. या सर्व तरुणांमध्ये आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तळमळ असल्याचे दिसले. ‘यिन’ने तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. - सुरेश भोळे, आमदार

"जळगावसारख्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यात गांधी तीर्थसारखे जगविख्यात स्थळ आहे, याचे कौतुक वाटते. या पवित्र स्थळाला भेट दिल्यावर तेथून ज्ञान, माहितीच नव्हे, तर प्रेरणाही मिळते." - बाजीराव शिंदे, ‘यिन’ स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री

"गांधी तीर्थ’ला भेट दिल्यावर आम्ही सर्व काही विसरलो. महात्मा गांधींबद्दल ऐकले होते, वाचले होते, अभ्यासले होते; पण याठिकाणी गांधींच्या युगात नेणारे वातावरण अनुभवले. येथील आमदार व जळगाव जिल्ह्याच्या आदरातिथ्यानेही आम्ही भारावलो." - विश्‍वभूषण पाटील, विरोधी पक्ष सदस्य तथा सामाजिक समिती अध्यक्ष

Members of the 'Sakal-yin' Shadow Cabinet present during the visit to the 'Gandhi Tirtha'.
Nashik YIN News: नाशिकचे भौगोलिक सौंदर्य ऊर्जायुक्त : डवले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.