धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार

धरणगाव जागृत जनमंचची तक्रार; संबंधितांवर कारवाईची मागणी
धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार
Updated on

धरणगाव, ता. १७ : येथील नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार धरणगाव जागृती जनमंचने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल न घेतल्यास व कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती धरणगाव जागृत जनमंचचे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

मागील पाच वर्षांत धरणगाव पालिकेत मोठ्या प्रमाणात निधी आला. मोठ्या प्रमाणात शहरात नको ती कामे, नको त्या ठिकाणी झालीत. परंतु धरणगाव शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न जैसे थे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरला ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु येणाऱ्या काळात पुन्हा पाण्याची समस्या जटील होणार आहे. पालिकेने मलिदा खाण्यासाठी कामावर काम, रस्त्यावर रस्ते, नको तिथे पेव्हर ब्लॉक अशा प्रकारे गरज नसलेली निकृष्ठ दर्जाची कामे केली आहेत. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे.

धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार
"हे मोदी सरकारचं षडयंत्र"; सिंघु सीमेवरील खून प्रकरणावरून टिकैत यांचा आरोप

कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत शासनाने बांधकामावर पैसा खर्च न करता आरोग्यावर खर्च करावा, असे आदेश असताना कोरोना काळात मोठ्या प्रमाणात टक्केवारीचे गणित बांधत बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. नाईलाजाने यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार असल्याचे महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे. धरणगाव पालिकेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.

तक्रारीत म्हटल्यानुसार, धरणगाव पालिकेत१९९५ ते २०२० चे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे. या तपासणीत मोठ्या प्रमाणात धरणगाव पालिकेत अनियमितता तसेच गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक वेळा लेखा परीक्षणासाठी लेखे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे लेखापरीक्षण देखील झाल्याचे दिसून येत नाही.सन २०१७ ते २०१९ मधील लेखा परिच्छेदांमध्ये मोठ्या स्वरुपाची रक्कम आक्षेपाधिन, गंभीर स्वरूपाच्या त्रुटी, वसूल पात्र रक्कम मोठ्या स्वरूपता दिसून येते. लेखा परीक्षणात मोठ्या स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार
प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली

..अन्यथा न्यायालयात जाणार

दंडाची आकारणी, योग्य त्या कायद्यानुसार शास्ती, योग्य त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच लेखा परीक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पूर्तता करून अनुपालन करण्यात यावे. तसेच सन २०१९-२०२० चे लेखापरीक्षण तातडीने करण्यात येवून त्यातील आक्षेपांची देखील पूर्तता तातडीने करण्यात यावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे.

पालिकेच्या कारभाराचे लेखापरीक्षण शासनाच्या नियमाप्रमाणे झालेले आहे. लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपांची पूर्तता करणे ही प्रशासकीय बाब आहे. पालिकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. लेखा परीक्षणात दोष, त्रुटी आढळून आल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई आणि कार्यवाही होईल.

- नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव पालिका.

लेखा परीक्षणात आक्षेप हा विषय फक्त धरणगाव नगरपरिषदेचा नसून सर्वच नगरपरिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आलेले असतात. धरणगाव नगरपरिषद ही विहीत मार्गाने नोंदवलेला आक्षेपांचे अनुपालन करण्यासाठी योग्य ती कारवाई करीत आहे. आक्षेप नोंदवला म्हणजे गैरव्यवहार झाला, असा सरळ अर्थ घेणे उचित होणार नाही.

- जनार्दन पवार, मुख्याधिकारी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.