MLA Chandrakant Patil : बोदवडला ‘शादीखाना’साठी 1 कोटी निधी : आमदार चंद्रकांत पाटील

MLA Chandrakant Patil while inaugurating vehicles with fire extinguishers
MLA Chandrakant Patil while inaugurating vehicles with fire extinguishers esakal
Updated on

MLA Chandrakant Patil : शहरात प्रत्येक समाजासाठी सभागृह व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असून, मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉलसाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शहरातील गांधी चौकात स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीकडून अग्निशमन बंब, ट्रॅक्टर व दोन घंटागाड्या या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यात माजी सैनिक व ८० सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (MLA Chandrakant Patil informed that fund of one crore rupees has been approved for Shadikhana hall jalgaon news)

या वेळी माजी उपसरपंच युनूस बागवान, नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड, डॉ. उद्धव पाटील, मिठूलाल अग्रवाल, गोपाल अग्रवाल, सईद बागवान, विकास कोटेचा, कस्तुराबाई घुले अफसर खान, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी आमदार पाटील म्हणाले, की शहरात दोनच मंगल कार्यालये आहेत. मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉलबरोबरच मराठा समाजासह राजपूत, वंजारी, न्हावी, माळी या समाजाच्या सभागृहांसाठी निधी मंजूर झाला आहे. तसेच शहरात दत्त कॉलनी, रूपनगर, आनंदनगर यासह इतर परिसरात रस्ते, गटारींची कामे मंजूर केली आहे.

यासह विविध विकासकामांना १२ कोटींचा निधी आणला आहे. तसेच शहरासह तालुक्यात पाण्याची समस्या असून, मागील लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील ५१ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित केली, परंतु या योजनेकडे लक्षच दिले नाही. ३० वर्षांचा सत्तेचा काळ व युती काळात मंत्री, त्यानतंर पुढे विरोधी पक्षनेते आणि मागील काळात बारा खात्याचे मंत्री असताना आपणास दुष्काळ पाहावा लागत आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Chandrakant Patil while inaugurating vehicles with fire extinguishers
MLA Chandrakant Patil : मुक्ताईनगरला पूल, रस्त्यांसाठी 30 कोटी; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व तालुक्याला वेगळी योजना मंजूर करून दररोज शुद्ध पाणीपुरवठा करणार आणि जलसिंचन योजनेसाठी नियामक मंडळाची परवानगी मिळाली असून, जामठी टू जलसिंचन योजनेचे लवकरच उदघाटन होणार आहे, असे त्यांनी सांगितले. शहरातील मराठी शाळा परिसरातील संकुलास मंजुरी मिळाली आहे. या ‘एमआयडीसी’चा मार्गही लवकरच मोकळा होणार आहे.

एका वर्षात ही सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून जीनिंग संघाकडून अग्निशमन बंबाची मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने जीनिंग संघ, व्यापारी संघटना, ज्वेलर्स संघ, मेडिकल, डॉक्टर युनियन, महाकाल ग्रुप यासह विविध संघटनांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक राजेश नावाने, नगरसेविका पूजा जैन, मीराबाई माळी, बेबीबाई चव्हाण, बेबीबाई माळी, शारदा बोरसे, सुनीता बडगुजर, दिनेश माळी, गोलू बरडिया, मयूर बडगुजर, हर्षल बडगुजर, नितीन चव्हाण, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, सुनील बोरसे, संजय गायकवाड, दीपक माळी, हरून सौदागर, रईस ठेकेदार, काली शेख, मनोज पाटील, धनराज गंगतिरे, अप्पू असलम, बागवान इरफान, स्वीय्य सहायक प्रवीण चौधरी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. संदीप तायडे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

MLA Chandrakant Patil while inaugurating vehicles with fire extinguishers
MLA Chandrakant Patil : बोदवड पाणीपुरवठा योजना अपयशी; आमदार पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.