जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण(चाळीसगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी आज संचालक मंडळाची संघाच्या सभागृहात सकाळी नऊला बैठक झाली.
पिठासीन अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई होते. अध्यक्षपदासाठी भाजप-शिदें गटाचे संचालक, आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला. संजय पवार सूचक तर अरविंद देशमुख अनुमोदक होते.
एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड घोषित केली. (MLA Chavan unopposed for post of President Conducted transparent administration present facts to people Jalgaon News)
महाविकास आघाडीच्या पाच सदस्यपैकी आमदार अनिल पाटील गैरहजर होते. शिंदे-भाजप गटाचे सर्व १५ संचालक उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते.
संघाला अव्वलस्थानी नेऊ : चव्हाण
चेअरमनपदी निवड झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते म्हणाले, संघात अत्यंत पारदर्शीपणे काम करण्यात येईल. संघाची आजची स्थिती काय आहे? याची वस्तुस्थिती आपण आठ दिवसात सर्वासमोर मांडणार आहोत. संघ राज्यात अव्वल क्रमांकावर राहील असे चांगले काम आपण करणार आहोत. मंत्री महाजन व पाटील तसेच सर्व सदस्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून चेअरमनपदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
अपहाराची चौकशी होणार
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, गेल्या काळात दूध संघात झालेल्या अपहाराची चौकशी होईलच, ज्यांनी गैरव्यवहार केला असेल त्यांना शिक्षा होईलच, परंतु ही पहिलीच सभा असल्यामुळे आम्ही गैरव्यवहाराचा विषय त्यात घेतलेला नाही. मंगेश चव्हाण निश्चित संघाचा कारभार चांगल्या पध्दतीने सांभाळतील. राज्यात दूध संघ क्रमांक एकवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.
एकनाथ खडसेंचा फोटो हटविला
जिल्हा दूध संघाच्या नवनियुक्त संचालक मंडळाची सभा झाली. चेअरमन निवडीनंतर मंगेश चव्हाण यांच्या दालनात असलेला माजी मंत्री एकनाथ खडसे याचे छायाचित्र हटविण्यात आले. आमदार चव्हाण हे खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव करून निवडून आले होते. जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षे सत्ता होती. याविषयी मंत्री महाजन म्हणाले, त्या ठिकाणी त्यांच्या फोटोची गरज नाही, त्यामुळे आम्ही तो फोटो हटविला. त्या ठिकाणी आम्ही आमचाही कोणाचा फोटो लावणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.