Jalgaon News: मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबतच : आमदार चिमणराव पाटील

MLA Chimanrao Patil speaking in public meeting. District Bank Vice President Amol Patil, District Head Vasudev Patil, Former Chairman Shaligram Gaikwad and office bearers on the platform.
MLA Chimanrao Patil speaking in public meeting. District Bank Vice President Amol Patil, District Head Vasudev Patil, Former Chairman Shaligram Gaikwad and office bearers on the platform. esakal
Updated on

Jalgaon News : मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.

कासोदा-आडगाव जिल्हापरिषद मतदार संघातील चौदा गावांत सुमारे ८८ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी कासोदा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. (MLA Chimanrao Patil statement along with Chief Minister Shinde for development of constituency jalgaon news)

ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास कासोदा येथे भव्य शिवस्मारक उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी उत्राण येथील आनंदा धनगर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कासोदा- आडगाव गटातील धारागीर, पळासदड, भालगाव, पातरखेडा, जळू, नांदखुर्द बुद्रुक आणि खुर्द, हनुमंतखेडे बुद्रुक आणि मजरे, सोनबर्डी, बांभोरी, वनकोठे, उमरे, फरकांडे, मालखेडा, आडगाव आणि कासोदा येथे विविध विकासकामचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. सकाळपासून सुरू असलेल्या कार्यक्रमांचा रात्री कासोदा येथे जाहीरसभा घेऊन समारोप करण्यात आला. प्रत्येक गावात मान्यवरांचे आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी औक्षण केले.

MLA Chimanrao Patil speaking in public meeting. District Bank Vice President Amol Patil, District Head Vasudev Patil, Former Chairman Shaligram Gaikwad and office bearers on the platform.
Jalgaon News: जिल्ह्यात 27 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार; पालकमंत्र्यांची मंजुरी

या वेळी आमदार पाटील म्हणाले, मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे पाहून मानसिक आनंद मिळत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे हतबल झालेले विरोधक अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कासोदा येथे ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य शिवस्मारक उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, बाजार समितीचे माजी सभापती, शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, धारागीर येथील युवा नेतृत्व नरेंद्रसिंग पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, माजी सभापती अनिल महाजन, तालुका संघटक संभाजी पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शहरप्रमुख कृष्णा ओतारी, मयूर महाजन, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश देसले, बाजार समितीचे संचालक किरण पाटील, गजानन पाटील, डॉ. सतीश देवकर, आडगावचे उपसरपंच दिलीप पवार, कासोद्याचे सरपंच बंटी चौधरी, माजी सरपंच महेश पांडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Chimanrao Patil speaking in public meeting. District Bank Vice President Amol Patil, District Head Vasudev Patil, Former Chairman Shaligram Gaikwad and office bearers on the platform.
Jalgaon News: पिंप्राळा उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनांची कोंडी मिटली; काम अपूर्ण असल्याने नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.