जळगाव : वीज कंपनीचा भोंगळ कारभार आज पुन्हा आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चव्हाट्यावर आणला. वीज भरूनही बिल थकबाकी असल्याचे दाखवीत आमदार संजय सावकारे यांची वीज कापणे, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे, आधी थकबाकी भरा नंतर विजेची मागणी करा, बिल भरल्यावर आमच्याकडे ऑइल नाही, ऑइल आल्यावर ट्रान्सफॉर्मर सुरू करू असे एक ना अनेक तक्रार बैठकीत करण्यात आल्या. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कारभार सुधारावा, ऑइल संपण्या अगोदर चार दिवस ऑइलची व्यवस्था करा, अन्यथा तक्रार आल्यास कारवाई करतो, असा इशाराच दिला.
उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार वीज जाणे ही नित्याचीच बाब. असे असले असले वीज बिलांची चुकीची बिले देणे, याचे बिल त्यांना देणे, बिल भरल्यावरही वीज पुरवठा खंडित करणे, शेतकऱ्यांच्या वीज पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणे, आदी तक्रारी वीज कंपनी विरोधात सर्वच लोकप्रतिनिधीकडे आल्या होत्या. त्यांचा पाढा या बैठकीत वाचण्यात आला.
आमदार संजय सावकारे यांनी वीज बिल भरून त्यांच्याकडे बिल थकबाकी असल्याचे सांगत वीज कट करण्याची सूचना देण्यात आली. जेव्हा सावकारे यांनी वीज कंपनीच्या मुख्य अभियंता शेख यांना बिल चुकीची दिल्याचे सांगितले. तेव्हा शेख यांनी चुकीची दुरुस्ती करण्यास सांगून वीज खंडित होण्यापासून थांबविले. हाच धागा पकडत सावकारे यांनी माझ्या सारख्यासोबत वीज कंपनी असे करीत असेल तर इतरांचे काय? असे सांगत तक्रारी मांडल्या. त्यासोबतच आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ आदींनी तक्रारी मांडल्या.
जिल्ह्याचे खतांचे लिकींग?
जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात खतांचे लिकींग होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कदाचित हे चित्र जिल्ह्यात असेल, असे प्रकार हेात असल्यास त्यावर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. अवकाळी पावसाचे पंचनामे करताना सँपल पकडून पंचनामे करावेत, बियाणे, खतांची टंचाई व्हायला नको अशा सूचना देण्यात आल्या.
पिकविम्यासाठी पैशांची मागणी
पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी हेक्टर सात हजार रुपयांची मागणी करतात. अशा तक्रारी शेतकरी करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कोणालाही असे पैसे देवू नये, त्याची तक्रार करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नुकसान झालेल्यांना मदत मिळणार आहे.
आकाशवाणी सर्कलवर अंडरपास
शहरातील आकाशवाणी सर्कलला अंडरबायपास करणे सह विविध ठिकाणी अंडरपास करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होते. अनेक ट्रक तेथे उभ्या असतात त्या हटविण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ डॉ.पंकज आशिया, आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.