Eknath Khadse News : तांबापूऱ्याला ७/१२ उतारा लावण्यासाठी प्रयत्न करू : आमदार खडसे

MLA Eknathrao Khadse etc. while felicitating office bearers.
MLA Eknathrao Khadse etc. while felicitating office bearers.esakal
Updated on

Eknath Khadse News : सिंधी कॉलनीला ज्याप्रमाणे ७/१२ उतारा लावून दिला, त्याची पुनरावृत्ती करून तांबापूऱ्याला ७/१२ उतारा लावून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे आश्‍वासन आमदार एकनाथराव खडसे यांनी दिले.

तांबापूरा येथे शहीद अब्दुल हमीद चौकात आसिफ शेख अन्वरतर्फे झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. (MLA Khadse statement about Tambapura try to apply 7 12 jalgaon news)

गेल्या ६ जुलैला मुसळधार पावसामुळे तांबापूरामधील अनेक नागरिकांच्या घरातील अत्यावश्यक वस्तू, टीव्ही, फ्रीज, कपडे आदींचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे पंचनामे होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटूनही येथील गोरगरीब नागरिकांना नुकसान भरपाई मिळत नव्हती.

या दीड महिन्याच्या संघर्षपूर्ण काळात सामाजिक कार्यकर्ते अस्लम काकर, विकार खान यांनी सगळे कागदोपत्री पाठपुरावे, मोर्चारुपी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, नंतर स्मरणपत्रही देण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनाही निवेदने सादर केली. आमदार खडसेंनाही याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Eknathrao Khadse etc. while felicitating office bearers.
Eknath Khadse News : निकृष्ट पोषण आहाराद्वारे मुलांच्या जिवाशी खेळ : एकनाथ खडसे

त्यांनी येथील २७१ पिडीत नागरिकांना दहा हजार रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणल्याबद्दल आमदार खडसेंचा सत्कार करण्यात आला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, अलफैज शिक्षण संस्थेचे अजीज सालार, एजाज मलिक, मणियार बिरादरीचे फारुख शेख, मजहर पठाण, रिजवान खाटीक आदी उपस्थित होते.

संघर्षपूर्ण काळात खंबीर साथ देणारे शेख नियाजोद्दीन, शफी शेख, अब्दुल बासीत, अकील पेंटर, लूकमान शेख, अहेमद खान, इस्माईल खान, इम्रान खान यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. आसिफ मिर्जा यांनी सूत्रसंचालन केले. आसिफ शेख अन्वर यांनी आभार मानले.

MLA Eknathrao Khadse etc. while felicitating office bearers.
Eknath Khadse : शरद पवारांचं ऐकलं नाही म्हणून पाच वर्ष वाया गेली, असं का म्हणाले एकनाथ खडसे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.