पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) हे एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडखोर गटात सामील होऊन सध्या गुवाहाटी येथे असून, त्यांनी ‘आप्पा आपण मातोश्रीवर परत यावे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व स्वीकारावे’ अशी आर्त विनवणी करणारे पत्र उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) केले आहे. तसेच शनिवारी (ता. २५) मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन आयोजिले आहे. (mla Kishor Patil Deputy district chiefs letter goes viral on social media Jalgaon News)
अॅड. पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे, की मी आपला मित्र आहे. आपणास हात जोडून कळकळीची विनंती करतो, की माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या विनंतीवरून आपण पोलिस खात्याची नोकरी सोडून राजकारणात आलात. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी आपणावर नितांत प्रेम केले व आपण पहिल्याच प्रयत्नात लोकनियुक्त नगराध्यक्ष झालात. मतदारसंघातील सच्च्या शिवसैनिकांनी आपल्याला स्वीकारले. शिवसेनेत आल्यापासून आपणाला अनेक पद मिळाली.
जिल्हा बँक, दूध संघ, विकास सोसायट्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपले नेतृत्व प्रस्थापित झाले. या सर्व सत्ता शिवसैनिकांनी आपल्या हाती बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिल्यात. आपणही या पदांवर राहून अनेक विकासाची कामे करून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला.परंतु आपण बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने आम्हा शिवसैनिकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. आपण परत यावे, अन्यथा पुढच्या कोणत्याही निवडणुकीत आपल्याला शिवसेनेच्या नावावर सच्चे शिवसैनिक मतदान करणार नाहीत व आपले नेतृत्व स्वीकारणार नाहीत. आपल्या मतदारसंघात एकनाथ शिंदे आपल्या समर्थनार्थ येणार नाहीत, असेही त्यांनी या पत्रातून म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.