Jalgaon News : पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळी जाहीर : आमदार किशोर पाटील

drought
droughtesakal
Updated on

Jalgaon News : पाचोरा व भडगाव तालुका दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झाला असून ‘नदीजोड’साठी संपादीत केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिल्याने हा प्रश्नही मार्गी लागला असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.(MLA Kishor Patil statement of Pachora Bhadgaon taluka drought declared )

येथील ‘शिवतीर्थ’च्या प्रांगणात शुक्रवारी (ता. १०) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेला रावसाहेब पाटील, प्रताप पाटील, डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी सांगितले, की २००७ मध्ये जिल्हाधिकारी विजय सिंगल यांच्या काळात पाचोरा व भडगाव तालुक्यातील नदीजोड प्रकल्पाचा विषय पुढे आला होता.

त्याला गतीही मिळाली होती. परंतु २००९ ते २०१४ या काळात नदीजोडचे हेड बंद झाले. २०१७ मध्ये मी पुन्हा प्रयत्न करून ते हेड सुरू केले. त्यासाठी पैशांची तरतूदही झाली. तेव्हापासून नदीजोडसाठी संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न चालवले. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी यासंदर्भात सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या मदतीचे धनादेश संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने आता नदीजोडचा विषय मार्गी लागला असल्याने मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यास हातभार लागणार असल्याचे स्पष्ट केले.

drought
Jalgaon News : अंत्योदय कार्डधारकांची दिवाळी साखरेविना ‘कडू’

पाचोरा व भडगाव हे दोन्ही तालुके पहिल्या टप्प्यात दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले नाहीत. त्याचवेळी तालुके दुष्काळी जाहीर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला होता. त्यानंतर पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष मंत्री अनिल पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून तालुक्यातील दुष्काळी स्थितीची जाणीव करून दिल्याने पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल पाटील यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. यामुळे दुष्काळी सवलती मिळणार असून शेतकरी, विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिल्याचा आनंद असल्याचे स्पष्ट केले.

drought
Jalgaon News : श्रीरामरथ वहनोत्सवास उद्यापासून प्रारंभ; 11 दिवसांच्या वहनानंतर रथोत्सव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.