Rakshabandhan 2023 : राजकीय विरोधावर वरचढ ठरले नात्याचे पावित्र्य! आमदार पाटील यांनी बहिण वैशालीकडून बांधली राखी

MLA Kishore Patil tying rakhi at the Rakshabandhan program of Vaishali Suryavanshi at the Shiv Tirth office.
MLA Kishore Patil tying rakhi at the Rakshabandhan program of Vaishali Suryavanshi at the Shiv Tirth office.esakal
Updated on

प्रा सी एन चौधरी : सकाळ वृत्तसेवा

Rakshabandhan 2023 : कौटुंबिक नातेसंबंध कितीही विकोपाला गेले तरी देखील रक्ताची नाती प्रेम, आपुलकी आणि स्नेहभाव विसरत नाहीत. म्हणूनच राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील अनेक जण आपल्या जवळच्या नातलगांशी होणारे मतभेद सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विसरून एकत्र येत असल्याचे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील. (MLA Kishor Patil tied rakhi from sister Vaishali Suryawanshi jalgaon news)

अशीच नात्याच्या पवित्र्याची अनुभूती पाचोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त आली. कट्टर राजकीय विरोधक बनलेले आमदार किशोर पाटील व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी हे रक्षाबंधनानिमित्त एकत्र आले व आमदारांनी सारे राजकीय मतभेद विसरत बहिणीकडून राखी बांधून घेतली.

आमदार किशोर पाटील हे माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार किशोर पाटील हे प्रथमपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत राहिले. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना आमदार किशोर पाटील यांच्या या भूमिकेसंदर्भात खंत वाटली.

त्यांनी आपल्या वडिलांशी ठाकरे कुटुंबाशी असलेले संबंध व एकनिष्ठता विचारात घेऊन त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळेपासून आमदार किशोर पाटील व वैशाली सूर्यवंशी या भाऊ-बहिणींमध्ये सुंदोपसुंदी व राजकीय ओढाताण वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Kishore Patil tying rakhi at the Rakshabandhan program of Vaishali Suryavanshi at the Shiv Tirth office.
Rakshabandhan History : सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा एका राखीमुळे त्याचे प्राण वाचले होते ?

वैशाली सूर्यवंशी यांनी सुरू केलेला राजकीय प्रवास व पुढील निवडणुकांसाठी चालवलेली तयारी यामुळे दोघांमधील राजकीय विरोध कमालीचा वाढत आहे.

असे असताना आमदार किशोर पाटील यांनी गेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी वैशाली सूर्यवंशी यांचे निवासस्थानी जाऊन राखी बांधून घेतली होती. त्यानंतर या संदर्भात साधकबाधक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. परंतु नातेसंबंधात राजकारण नसावे, असे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले होते. यावेळी देखील वैशाली सूर्यवंशी यांनी शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात 'राखीला हाथ द्या, बहिणीला साथ द्या' या घोषवाक्या अंतर्गत रक्षाबंधनाचा जाहीर कार्यक्रम ठेवला.

या कार्यक्रमास आमदार किशोर पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आमदार पाटील यांनी आपले पुत्र युवा नेते सुमित पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांचेसह मित्रमंडळी सोबत शिवसेना कार्यालयात येऊन वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते राखी बांधून घेतली व त्यांना रक्षाबंधन भेटही दिली. त्यामुळे राजकीय विरोधावर अखेर नाते संबंधाचे पावित्र्य वरचढ ठरल्याचे सिद्ध झाले. या प्रसंगाची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली.

MLA Kishore Patil tying rakhi at the Rakshabandhan program of Vaishali Suryavanshi at the Shiv Tirth office.
Rakshabandhan 2023 : आमदारांच्या कन्येने ‘त्या’ भावाला बांधली राखी! गोंडगाव येथे सहकुटुंब भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.