MLA Kishore Patil : वाढदिवसानिमित्त ‌सर्व कार्यक्रम रद्द : आमदार किशोर पाटील

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार किशोर पाटील.
MLA Kishore Patil statement All programs canceled on the occasion of birthday nashik news
MLA Kishore Patil statement All programs canceled on the occasion of birthday nashik news
Updated on

MLA Kishore Patil : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने होत असून, मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी या मागणीसाठी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे.

मीही मराठा समाजासोबत असून, जोपर्यंत मराठा समाजाची मागणी मान्य होऊन त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कार्यक्रम अथवा आनंदोत्सव साजरा करणार नाही. बुधवारी (ता. १) आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करीत असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (MLA Kishore Patil statement All programs canceled on the occasion of birthday nashik news)

‘शिवालय’ या संपर्क कार्यालयात आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, की १ नोव्हेंबरला साजरा होणारा माझा वाढदिवस आणि त्यानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीत होणारे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आनंदोत्सव साजरा करणार नाही.

आमदार पाटील म्हणाले, की माझा वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीतील माझ्यावर प्रेम करणारे स्नेही एक उत्सव म्हणून साजरा करतात; परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची परिस्थिती पाहता, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी पाठिंबा देत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

MLA Kishore Patil statement All programs canceled on the occasion of birthday nashik news
Jalgaon News : सर्वच प्रवर्गात तृतीय पंथीयांना मिळावे 1 टक्का आरक्षण

माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी गावागावांत व शहरात लावलेले शुभेच्छा बॅनर काढून टाकावे. कोणीही शुभेच्छा बॅनर लावू नयेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे तातडीची बैठक बोलवली असून, या बैठकीसाठी मी १ नोव्हेंबरला मुंबईला जाणार आहे. मला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी निवासस्थानी व कार्यालयात गर्दी करू नये. वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारा शेतकरी व आदिवासी मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.

‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सातगाव डोंगरी येथून सुरू केला होता. हे गावही दत्तक घेतले आहे. दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द करीत असून, कोणतेही भूमिपूजन अथवा उद्‌घाटन आपण करणार नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी पद्मसिंह पाटील, संजय गोहिल, सभापती गणेश पाटील, शरद पाटे, चंद्रकांत धनवडे, किशोर बारवकर, विकास पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

MLA Kishore Patil statement All programs canceled on the occasion of birthday nashik news
Jalgaon News : व्यापारी संकुलातील अनधिकृत बेसमेंट कारवाई प्रकरणात साटेलोटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.