Jalgaon News : उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यावर भर : आमदार किशोर पाटील

समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांचे जगणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
With the disabled on the occasion of distribution of materials Dr Ayush Prasad, MLA Kishore Patil
With the disabled on the occasion of distribution of materials Dr Ayush Prasad, MLA Kishore Patil esakal
Updated on

पाचोरा : समाजातील सर्व वंचित व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणार असून, समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांचे जगणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

येथे दिव्यांग बांधवांच्या साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. (MLA Kishore Patil statement of emphasized on bringing marginalized sections into stream of development jalgaon news)

मोंढाळा रोडवरील तुळजाई जीनिंगच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार पाटील, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार संभाजी पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष संजय गोहिल.

माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), शहरप्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, डॉ. भरत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, माजी नगरसेवक राम केसवानी, दत्ता जडे, बापू हटकर, गंगाराम पाटील.

अय्युब बागवान, पंढरीनाथ पाटील, इंदल परदेशी, प्रकाश तांबे, राहुल पाटील, युसूफ पटेल यांच्या उपस्थितीत पाचोरा व भडगाव या तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून ३० लाख रुपयांचे सुमारे सहाशे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी दिव्यांगांचे जीवन सुलभ होण्यास मदत होईल, अशा पद्धतीचे साहित्य वाटप होत असून, दिव्यांगांच्या तपासण्या तालुकास्तरावर मेडिकल तपासणी शिबिरे घेऊन कराव्यात व तेथेच प्रमाणपत्र द्यावे. पुरवठा विभागाने शिधापत्रिका अपडेट करून दिव्यागांना त्यांचा लाभ द्यावा.

With the disabled on the occasion of distribution of materials Dr Ayush Prasad, MLA Kishore Patil
Jalgaon News: कापसाला भाव द्या, बोगस डॉक्टरांवर कारवाई करा; भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा धडक मोर्चा

संजय गांधी योजनेच्या पेन्शनचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात द्यावा, अशा सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते सहाशे दिव्यांगांना ३० लाखांचे थ्री व्हील सायकल, कृत्रिम अवयव काठी, कर्णयंत्र आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग, त्यांचे कुटुंबीय, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस. पी. गणेशकर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण ब्राम्हणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

शासकीय योजनांचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगांसाठी मिळणारा १० लाखांचा निधी आता ३० लाख झाला असून, आमदारांच्या प्रयत्नाने शासनाच्या नियमात बदल झाला असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी म्हणाले.

त्यांनी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभा करावा, असे सांगितले.

With the disabled on the occasion of distribution of materials Dr Ayush Prasad, MLA Kishore Patil
Jalgaon Municipality News : जळगावात रस्ते सफाईसाठी लवकरच इलेक्ट्रीक झाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.