Jalgaon News : शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करणे विमा कंपन्यांना महागात पडणार!

mla chandrakant patil with cm eknath shinde
mla chandrakant patil with cm eknath shindeesakal
Updated on

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरून घेतला, त्यांच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम अदा करून घेतली आणि ३ महिन्यांनी विमा कंपनीला कोणता साक्षात्कार झाला?

त्यामुळे विमा कंपनीला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे जड जात असल्याचा आरोप करून विमा कंपन्यांवर अंकुश लावण्याची व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ अदा करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली.(MLA Patil demanded Cm to curb insurance companies pay compensation amount to farmers immediately jalgaon news)

या वेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील लागलीच सचिव एकनाथ डवले यांना विमा कंपन्यांना पत्रव्यवहार करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे, की चालू वर्षाचा केळी पीकविमा हप्ता हा शेतकऱ्यांकडून शेवटची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत भरून घेतला गेला. तसेच त्यांच्या खात्यातून विमा हप्त्याचे पैसे वेळेत अदा करून घेतले.

या प्रक्रियेला तीन महिन्यांचा अवधी उलटून गेला असताना विमा कंपनीला अचानक साक्षात्कार झाला व त्यांनी शेतकऱ्यांना जाचक अटीमध्ये अडकविण्याचे काम सुरू केलेले असून, केळी पीकविम्याचे अनेकांचे प्रस्ताव कंपनीने परत पाठविण्याच्या माहितीने शेतकरी बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

mla chandrakant patil with cm eknath shinde
Jalgaon News: सुरक्षारक्षकांची विना निविदा नियुक्ती भोवली; अधिकाऱ्यांवर खटला दाखल

मुळात परत प्रस्ताव पाठवण्याची कारणे पाहता शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई देणे विमा कंपनीच्या जिव्हारी बसत असल्याचे दिसून येत आहे. पीक विमा कंपनी विमा नोंदविताना शेतकऱ्यांचे क्षेत्र असलेल्या शिवारात आपले प्रतिनिधी पाठवून जिओ टॅगिंग यंत्रणा वापरून क्षेत्र नोंदवित असते.

सोबत सॅटॅलाइट इमेज घेतली जाते. ती घेतल्याशिवाय विमा प्रस्ताव पुढील कारवाईस पात्र होत नाही, तसेच नफ्याने शेती करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यासंबंधी प्रस्तावात रीतसर कागदपत्रे जोडली असताना देखील असे असताना मूळ मालकाचे आधार कार्डवर अटेस्टेड मागविले जात आहे. यावरून असे निष्पन्न होते की विमा कंपनी शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवीत आहे.

mla chandrakant patil with cm eknath shinde
Jalgaon News : ठिबक साहित्य चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

विमा नोंदविताना शेतकऱ्यांकडून विम्याचा हप्ता प्रथमता भरून घेतला जातो. या माध्यमातून हजारो कोटी रुपये पीकविमा कंपनीकडे जमा असतात. विमा प्रस्ताव नोंदविताना बारीक बारीक निकष तपासून खात्री केल्याशिवाय विमा प्रस्ताव दाखल करून घेतला जात नाही.

परंतु विमा कंपनीने संभाव्य नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना भेटीस धरण्याचा संताप जनक प्रकार सुरू केला आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण आहे आणि त्यामुळे अन्याय झाल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

mla chandrakant patil with cm eknath shinde
Jalgaon News : कोळशाच्या मालगाडीचे 102 दरवाजे उघडे; औष्णिक वीज केंद्राकडून रेल्वेशी पत्रव्यवहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.