Rohit Pawar: फडणवीस ‘एसी’त बसून बोलू नका, परिस्थिती पाहा, राजीनामा द्या : आमदार रोहित पवार

Rohit Pawar vs Devendra Fadanvis
Rohit Pawar vs Devendra Fadanvisesakal
Updated on

Rohit Pawar News: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा दावा फडणवीस करीत आहेत, ते साफ चुकीची आहे. आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

पहिली दगडफेक झाली, हे साफ चूक आहे. अगोदर पोलिसांनी लाठीहल्ला केला, महिलांनाही मारले. आपल्या आईला जर लागत असेल तर मुलगा कसा गप्प बसेल? त्यानंतर दगडफेक झाली असेल.

परंतु देवेंद्र फडणवीस यांनी या लाठीहल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुर्ची सोडावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (MLA Rohit Pawar trolls Fadnavis over jalna maratha reservation protest lathi charge jalgaon political)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जळगाव येथे मंगळवारी (ता. ५) दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा हेसुद्धा जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी (ता. २) जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

त्या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदी उपस्थित होते. त्या वेळी आमदार रोहित पवार म्हणाले, की जालना येथे पोलिसांनी मराठा आंदोलकावर केलेला लाठीहल्ला माणुसकीला काळिमा फासणारा आहे.

आंतरावाली सराटी या गावाला भेट देऊन आलो आहोत. मनोज जरांगे कुटुंबीयांचीही भेट घेतली. ते संपूर्ण कुटुंब भयग्रस्त आहे, तसेच गावकऱ्यांचीही आपण भेट घेतली. गावकऱ्यांनी सांगितले, की आंदोलन शातंतेत सुरू होते.

मात्र पोलिसांनी पहिला लाठीहल्ला केला. महिला व लहान मुलांनाही बेदम मारहाण केली, यात महिलाही जखमी झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी केवळ वातानुकूलित दालनात बसून वक्तव्य करू नये, तर त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी व आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rohit Pawar vs Devendra Fadanvis
Jalgaon News: मस्त रे आप्पा...कधीकाळी अडगळीत पडलेल्या तालुका पोलिस ठाण्यास ISO मानांकन!

भाजपला आरक्षणाचे राजकारण करायचे आहे

भारतीय जनता पक्षाला मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवायचा नाही, त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. केंद्रात संसदेत चर्चेच्या वेळी एकही भारतीय जनता पक्षाचा मराठा खासदार बोलला नाही.

संभाजीराजे यांनाही राज्यसभेत बोलू दिले नाही. संजय राऊत यांनी विनंती केल्यानंतर संभाजीराजेंना पाच मिनिटे बोलू दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून एकप्रकारे दडपशाहीच केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

६० टक्क्यांच्या पुढे आरक्षण

देशातील आरक्षणाची मर्यादा ६० टक्क्यांच्या पुढे गेली असल्याचे मत व्यक्त करून आमदार पवार म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण ताबडतोब देण्यात यावे.

Rohit Pawar vs Devendra Fadanvis
Jalgaon News: HIV बधितांचे पुनर्वसन प्रशासन करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.