जळगाव : ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्याग व बलिदानामुळे भारतीय जनता पक्ष जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी गुरुवारी (ता. ६) येथे व्यक्त केले. (mla suresh bhole statement about BJP is number one in the world due to the sacrifice of senior workers jalgaon news)
भाजप जळगाव जिल्हा व महानगरातर्फे पक्षाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त बळिराम पेठेतील पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम भारतमाता, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालंचद पाटील, महापालिकेचे गटनेते राजेंद्र घुगे पाटील, ग्रामीणचे प्रभाकर पवार उपस्थित होते.
नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अराजकीय, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ नागरिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक देऊन सत्कार झाला. नंतर आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, की जनसंघ ते भाजप, असा पक्षाचा प्रवास असून, ४३ वर्षांमध्ये पक्षाने विश्वात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तळागाळापर्यंत विविध योजना पोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष असून, ३६५ दिवस अहोरात्र मेहनत करणारा भाजपचा कार्यकर्ता आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
नंतर पक्ष कार्यालयापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढण्यात आली. सुभाष चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ गौरव यात्रेचा समारोप झाला. तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या यात्रेत शिवसेनेचे गणेश सोनवणे, सरिता माळी कोल्हे, दिलीप पोकळे, शौभा चौधरी व पदाधिकारी सहभागी झाले होते.
‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘जब तक सूरज-चांद रहेगा सावरजीका नाम रहेगा’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयावर आकर्षक रोषणाई केली आहे. सकाळी महिलांनी सुंदर रांगोळी काढून कार्यालय फुलांनी सजविले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.