जळगाव : शहरातील दहा रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करा, असे निर्देश आमदार सुरेश भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. श्री. भोळे यांनी गुरुवारी (ता. ६) महापालिकेत विविध कामांचा आढावा घेतला. शहरातील विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. दहा रस्त्यांच्या कामाबाबत वर्कऑर्डर देऊनही कामे सुरू होत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर वॉटरग्रेस कंपनीकडे शहरातील स्वच्छतेचा मक्ता असतानाही त्यांच्यामार्फत कामे केली जात नसल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार भोळे यांनी गुरुवारी महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सतरा मजली इमारतीत तेराव्या मजल्यावर आयुक्तांच्या दालनाशेजारी सभागृहात बैठक झाली. या वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता मधुकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे, विद्युत अभियंता एस. एस. पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रस्तेकामाचा आढावा आमदार भोळे यांनी प्रारंभी रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. रस्तेकामासाठी आलेल्या ५८ कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटप सर्व प्रभागांत करून १८ मीटर, १२ मीटर रस्त्याची कामे करावीत, असे निर्देश दिले.(MLA Suresh Bhole Statement Regarding Road Construction Jalgaon news)
दहा रस्ते एकाच वेळी शहरातील दहा रस्त्यांचे काम सुरू न झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत आमदार भोळे यांनी आढावा घेतला. दहा रस्त्यांच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र तीन रस्त्यांचे काम झाल्याचे सांगण्यात येत आहे. मक्तेदार महापालिकेला कोणतीही माहिती देत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. दहा रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करण्याबाबत मक्तेदाराला आदेश द्या, त्याची संपूर्ण पाहणी करून आपल्याला माहिती द्या, तसेच उर्वरित ३९ रस्त्यांबाबतही तातडीने काम सुरू करा, असे निर्देश आमदार भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
अमृत’ टप्पा दोनची कामे करा शहरातील अमृत योजना टप्पा क्रमांक २ च्या बाबतीतही आमदार भोळे यांनी आढावा घेतला. याचे काम अद्याप सुरू न झाल्याने त्याचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी अमृत ०.२ चा निधी कोणत्याही स्थितीत परत जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आयुक्तांना सांगितले.
वॉटरग्रेसवर कारवाई करा शहरातील स्वच्छतेचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीकडे आहे, मात्र कंपनीतर्फे कामच केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत आरोग्याधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. वॉटरग्रेस कंपनीच्या साफसफाईकडे लक्ष द्यावे, त्यांच्याबाबत नागरिकांकडून कोणतीही तक्रार येऊ नये, तसेच शहरात रस्त्यावर जे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत त्याची साफसफाई होईल याची काळजी घ्यावी, कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या ताडपत्रीने झाकलेल्या असाव्यात, कंपनी कामे करीत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.
खदाणी कचऱ्याने भरू नका शहरातील खदाणी कचऱ्याने भरल्या जात असल्याबाबतच्या तक्रारीवर आमदार भोळे यांनी दखल घेतली. मेहरूण भागात भवानी मंदिर, इतर भागातील खदाणी या कचऱ्याने भरल्या जात आहेत. ते अत्यंत धोकादायक आहे. भविष्यात त्याच्यावर बांधकाम झाल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या खदाणी कचऱ्याने भरल्यास सक्त कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. या खदाणी मुरूम टाकून भरण्याचे काम महापालिकेने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.